हा आहे जगातील सर्वात छोटा कॅमेरा; दाण्यापेक्षाही छोटा आकार असलेला सेन्सर घडवू शकतो वैद्यकीय क्षेत्रात क्रांती
By सिद्धेश जाधव | Updated: December 7, 2021 19:23 IST2021-12-07T19:20:00+5:302021-12-07T19:23:29+5:30
OmniVision OV6948 हा जगातील सर्वात छोटा इमेज सेन्सर आहे. ज्याचा वापर व्यावसायिकरित्या केला जाईल. या इमेज सेन्सरचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील करण्यात आला आहे.

हा आहे जगातील सर्वात छोटा कॅमेरा; दाण्यापेक्षाही छोटा आकार असलेला सेन्सर घडवू शकतो वैद्यकीय क्षेत्रात क्रांती
ओमनीविजन टेक्नॉलॉजीजनं जगातील सर्वात छोट्या कॅमेऱ्याची निर्मिती केली आहे. हा कॅमेरा इतका छोटा आहे कि एखाद्या दाण्यापेक्षाही छोटा आहे. तसेच या कॅमेऱ्याच्या समावेश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आला आहे. या छोट्या कॅमेऱ्याचा आकार 0.65 x 0.65 x 1.158 मिमी इतका आहे. जो 40,000 पिक्सलची इमेज निर्माण करू शकतो.
OmniVision OV6948 नं जगातील सर्वात छोट्या व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या इमेज सेन्सरच्या स्वरूपात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे. याचा वापर शल्य चिकित्सक मानवी शरीराला जवळून बघण्यासाठी करू शकतात. यामुळे अनेक शस्त्रक्रियांमध्ये तसेच शरीराच्या तपासणीमध्ये या कॅमेऱ्याचा वापर खूप महत्वाचा ठरू शकतो.
हा जगातील सर्वात छोटा कॅमेरा 120-डिग्री FOV आणि f/2.8 अपर्चरसह लाँच करण्यात आला आहे. याची अजून एक खासियत म्हणजे इतर छोट्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत खूप कमी गरम होतो. त्यामुळे हा दीर्घकाळ मानवी शरीरात ठेवता येतो. या कॅमेऱ्याच्या मदतीने ब्रेन सर्जरी, हेमोटोलॉजी, न्यूरोलॉजी इत्यादी शस्त्रक्रिया करणं खूप सोपं होईल. OmniVision चा हा सेन्सर 4 मीटर पर्यंत डेटा ट्रान्सफर करू शकतो. या कॅमेऱ्याचा आकार छोटा असल्यामुळे पेशंटचा रिकव्हरी टाइम देखील कमी होईल, असं सांगण्यात आलं आहे.