Now the helmet will have AC cargo, the device will have to be installed! | आता हेल्मेटमध्येही एसीचा गारवा, लावावे लागेल हे डिवाइस!
आता हेल्मेटमध्येही एसीचा गारवा, लावावे लागेल हे डिवाइस!

हेल्मेटमुळे होणाऱ्या उकाड्यामुळे जर हेल्मेट वापरण टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात एक अनोखे डिवाइस आले आहे. हे डिवाइस हेल्मेटला जोडल्यावर तुम्ही हेल्मेट वापरण्याला टाळाटाळ करणार नाही. कारण शरीराची लाहीलाही करुन सोडणा-या उन्हाळ्यातही याने तुमचं डोकं थंड राहणार आहे. हे डिवाइस फारच यूनिक प्रकारे काम करते. या डिवाइसमध्ये असं म्हणूया की, एक छोटा एसी बसवण्यात आला आहे.
उकाडा आणि प्रदूषणापासून बचाव करणारा कूलर
या प्रॉडक्टचं नाव आहे BlueSnap2. हे प्रॉडक्ट बंगळूरुच्या एका कंपनीने तयार केलं आहे. हे डिवाइस हेल्मेटला अटॅच केल्यानंतर डोक तर थंड राहीलच. त्यासोबतच प्रदूषणापासूनही तुमचा बचाव होईल. कारण यात एक एअर फिल्टर लावण्यात आले आहे. याआधी कंपनीने एक BlueSnap प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. त्यात काही बदल करुन त्यांनी BlueSnap2  हे आणल आहे.
एअर कूलरची खासियत
या डिवाइसमध्ये एक छोटा पंखा लावण्यात आला आहे. हा पंखा ताजी हवा शोषून स्वच्छ आणि थंड करतो. त्यानंतर तो हवा हेल्मेटमध्ये दाखल होऊ देतो. म्हणजे कितीही तापमान वाढलं तरी तुम्हाला थंड वाटणार. या कूलरमध्ये फोम आधारित फिल्टर लावण्यात आले आहे. ज्यामुळे कूलरच पाणी जास्त वेळ चालत. या कूलरची किंमत २, २९९ रुपये इतकी आहे.
१० सेकंदात थंडा थंडा कूल कूल
सर्वात खास बाब म्हणजे हा कूलर केवळ १० सेकंदात गरम वातावरणात हेल्मेटला थंड करतो. इतकेच नाही तर बॅटरीवर चालणारा हा कूलर तुम्हाला कारचे फिलिंग देईल. म्हणजे धूळ-माती आत पोहोचणार नाही. यातील बॅटरी तुम्ही यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज करु शकता. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी १० तास चालते.


Web Title: Now the helmet will have AC cargo, the device will have to be installed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.