शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता नेटवर्कशिवाय कॉल; रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 16:48 IST

रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर  VoWi-Fi  सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.  

नवी दिल्ली : आगामी वर्ष ग्राहकांसाठी धमाकेदार असणार आहे. कारण, रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर  VoWi-Fi  सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.  

VoWi-Fi सर्व्हिस : आगामी काळात पब्लिक VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार, अशी घोषणा रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसांपूर्वी केली आहे. एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ सध्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये VoWi-Fi सर्व्हिसची चाचणी घेत आहे.  VoWi-Fi च्या मदतीने ग्राहक सेलुलर कनेक्टिव्हिटीशिवाय व्हॉइस कॉल करु शकतील.

मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन्स : स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये सध्या शाओमी, सॅमसंग, वनप्लस, वीवो आणि हुआवे यासारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या फीचर फोनच्या माध्यमातून मार्केटमध्ये स्थान निर्माण केले आहे. मात्र, आगामी वर्षात मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन्स घेऊन येणार आहे. यामुळे रिलायन्स जिओ मार्केटमध्ये धूमाकूळ घालणार असल्याचे दिसते. रिलायन्स जिओचे स्मार्टफोन्स स्वस्त आणि मस्त असणार आहेत. यासाठी कंपनी आपल्या भागिदारांसोबत काम करत आहे.    

Jio GigaFiber सर्व्हिस :रिलायन्स जिओने GigaFiber सर्व्हिसची घोषणा गेल्या जुलै महिन्यात केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये या सर्व्हिसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरु केले होते. मात्र, कंपनी आपल्या या हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिसला नवीन वर्षात लाँच करण्याची शक्यता आहे. ही सर्व्हिस देशातील 1,100 शहरांमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने या सर्व्हिससाठी 50 मिलियन कनेक्शनचे टारगेट ठेवले आहे. ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना Jio.com वर लॉग इन करावे लागणार आहे. याशिवाय जिओ अॅपवर सुद्धा या सर्व्हिससाठी ग्राहक रजिस्ट्रेशन करु शकतात. रजिस्ट्रेशनसाठी अद्याप कोणतीही फी आकारली जात नाही आहे. 

5 जी सर्व्हिस : रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम वाटपाच्या सहा महिन्याच्या आत 5 जी सर्व्हिस लाँच करण्याचा प्लॅन केल्याचे समजते. ही सर्व्हिस 2019-20 मध्ये येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, भारतात जास्तकरुन या सर्व्हिसचा फायदा ग्राहकांना 2021मध्ये होणार आहे.    

टॅग्स :Relianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओWiFiवायफायMobileमोबाइल