शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता तब्बल ८-के क्युएलईडी टीव्हीची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 11:26 IST

सॅमसंग कंपनीने ८-के रेझोल्युशन क्षमता असणारा जगातील पहिला क्युएलईडी या प्रकारातील टीव्ही सादर केला असून याचे अनावरण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस टीव्हीची रेझोल्युशन क्षमता वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

सॅमसंग कंपनीने ८-के रेझोल्युशन क्षमता असणारा जगातील पहिला क्युएलईडी या प्रकारातील टीव्ही सादर केला असून याचे अनावरण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस टीव्हीची रेझोल्युशन क्षमता वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आता फोर-के क्षमतेचे टीव्ही संच प्रचलित झाले आहेत. तर काही कंपन्यांनी यापेक्षा दुप्पट म्हणजे ८-के क्षमतेच्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने बर्लीन शहरात सुरू होणार्‍या आयएफए-२०१८ या टेकफेस्ट आधी सॅमसंगने क्यु९००आर क्युएलईडी ८-के हे मॉडेल सादर केले आहे. आधी बाजारपेठेत ८-के क्षमतेचे टिव्ही असले तरी हे मॉडेल क्युएलईडी या प्रकारातील पहिले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये ८-के रेझोल्युशन क्षमतेचा डिस्प्ले असून हे मॉडेल क्युएलईडी (क्वाँटम डॉट एलईडी) या प्रकारातील आहे.

हे मॉडेल फुल एचडीपेक्षा १६ तर फोर-के क्षमतेपेक्षा चार पटीने अधिक सुस्पष्ट असणार आहे. अर्थात, अन्य टीव्हींपेक्षा या प्रकारातील मॉडेल्समध्ये अतिशय सजीव अशा चलचित्रांचा आनंद घेता येणार असल्याची बाब येथे लक्षात घेण्याजोगी आहे. सध्या निवडक कंपन्या क्युएलईडी डिस्प्लेचा वापर करत आहेत. सॅमसंगचा प्रस्तुत टीव्ही हा याच प्रकारातील आहे. यात एचडीआर १० + या तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात अँबिअंट लाईट मोड दिलेला असून हे मॉडेल बंद असतांना यावर आर्टवर्क अथवा फ्रेम्स दर्शविता येणार आहेत. तर याला अतिशय दर्जेदार अशा ध्वनी प्रणालीची जोड देण्यात आलेली आहे.

या टीव्हीच्या मॉडेलमध्ये ८-के म्हणजे तब्बल ७६८० बाय ४३२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याच्या मदतीने अतिशय सुस्पष्ट अशा प्रतिमा आणि चलचित्र यावर पाहता येणार आहेत. यात अगदी सुक्ष्म बाबीदेखील अतिशय ठळकपणे पाहता येणार असल्यामुळे यावरून मिळणारी दृश्यानुभूती ही अफलातून असणार आहे. ६५, ७५, ८२ आणि ८५ इंच आकारमानाच्या पर्यायांमध्ये हा टिव्ही बाजारपेठेत उपलब्ध केला जाणार आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत सॅमसंगने अद्याप माहिती दिलेली नाही. तथापि, याबाबत कंपनीतर्फे लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन