शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 16:34 IST

भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे.

भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे. या कंपनीने तशी घोषणाच केली आहे. या कंपनीने नुकताच 5 जी फोनही लाँच केला आहे. 

Huawei ही कंपनी पुढील काळात 5G वर आधारित तीन डिव्हाईस लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये हा टीव्ही आहे. कंपनी केवळ स्मार्टफोनच नाही तर हायएंड अप्लाएन्स बाजारावरही छाप पाडण्याच्या प्रयत्नात आहे. Huawei ही कंपनी राऊटर, मोडेम, डाटाकार्ड सह अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनविते. तसेच या कंपनीचे स्मार्टफोन ब्रँडही आहेत. 

इंग्रजी वेबसाईट Nikkei ने दिलेल्या बातमीनुसार Huawei चा हा अल्ट्रा हाय डेफिनिशन 8 के रिझोल्युशनचा टीव्ही असणार आहे. हा एकमेव टीव्ही असा आहे ज्य़ामध्ये 5 जी मोडेम असणार आहे. याचाच अर्थ या टीव्हीमुळे फायबर ऑप्टिक्स किंवा केबल ऑपरेटरची गरज राहणार नाही. इंटीग्रेटेड मोडेम म्हणजे ते स्मार्ट टीव्ही, दुसऱ्या उपकरणांसाठी हाय स्पीड इंटरनेटचेही काम करणार आहे. एका अंदाजानुसार हा टीव्ही 360 डिग्री व्हिडीओ स्ट्रीम करण्यातही सक्षम असणार आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

 

Huawei देणार Samsung ला टक्करHuawei ने त्यांची उत्पादने कंझ्यूमर अप्लायन्सेसच्या श्रेणीमध्ये विस्तार करण्याचे ठरविले आहे. यामध्ये सॅमसंग आणि एलजी आघाडीवर आहेत. Samsung टीव्ही, स्मार्टफोन, विअरेबस आणि स्मार्ट होम उत्पादनांमध्ये आघाडीवर आहे. Samsung आणि सोनीने नुकताच त्यांचा 8K टीव्ही लाँच केला होता. तर अन्य चीनी कंपन्या 2020 पर्यंत हे टीव्ही लाँच करतील. जर यंदा Huawei ने हा टीव्ही लाँच केला तर बाजारात 5जीला आणखीन प्रसिद्धी मिळेल.

टॅग्स :huaweiहुआवेtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट