शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चुकूनही ठेवू नका हे १० कॉमन पासवर्ड; काही सेकंदातच होतात क्रॅक, पाहा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:59 IST

सर्वात सोप्या १० पासवर्डची यादी समोर आली आहे.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचे युग आहे, मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. सर्वत्र सोशल मीडियाचे जाळे पसरले आहे. मोबाईल, लॅपटॉप यामुळे सगळ्यांची कामे सोपी झाली आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. २०२२ मध्ये लोक आपल्या मोबाईल फोनच्या पासवर्डबद्दल गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. 

लोक सहज उघडता येतील असे पासवर्ड वापरत आहेत. मात्र याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. NordPass ने २०२२ च्या सर्वात कॉमन पासवर्डची यादी शेअर केली आहे. यामध्ये भारतातील ३.५ लाख लोक साइन अप करताना त्यांच्या पासवर्डमध्ये Password हा शब्द वापरतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ७५ हजारांहून अधिक भारतीय त्यांच्या पासवर्डसाठी BigBasket हा शब्द वापरत आहेत.

टॉप-10 पासवर्ड यावर्षीच्या टॉप-10 कॉमन पासवर्डमध्ये 123456, bigbasket, password, 12345678, 123456789, pass@123, 1234567890, anmol123, abcd1234 आणि googledummy यांचा समावेश आहे. हे पासवर्ड हजारो लोक वापरतात. भारताशिवाय इतर ३० देशांमध्येही हे संशोधन करण्यात आले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, अनेक लोक guest, vip, 123456 सारखे पासवर्ड वापरतात. दरवर्षी संशोधकांना हा पॅटर्न लक्षात येतो की स्पोर्ट्स टीम, मूव्ही कॅरेक्टर आणि फूड आयटम पासवर्डच्या यादीत अव्वल स्थानी असतात. लोक हे पासवर्ड मोठ्या प्रमाणात ठेवत असतात. हे पासवर्ड खूप सोपे असल्यामुळे हॅकर्संना याची मदत होते.  

असा पासवर्ड ठेवा पासवर्ड शक्यतो मोठा ठेवा आणि त्यात चिन्हे, संख्या आणि अक्षरांचा वापर करा. असे पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण होते, मात्र डेटा सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. त्यामुळे हॅकर्संना पासवर्ड क्रॅक करणे सोपे जात नाही. याशिवाय वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलlaptopलॅपटॉप