नोकियाची जय्यत तयारी! 48MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होईल Nokia Style+
By सिद्धेश जाधव | Updated: June 25, 2022 15:02 IST2022-06-25T15:02:46+5:302022-06-25T15:02:59+5:30
Nokia Style+ स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

नोकियाची जय्यत तयारी! 48MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होईल Nokia Style+
Nokia चा एक नवीन स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट्सच्या माध्यमातून दिसला आहे. त्यामुळे लवकरच बाजारात नोकियाचा नवा हँडसेट दिसू धाकतो. हा फोन Nokia Style+ नावानं US Federal Communications Commission (FCC) सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा आणि दमदार बॅटरीची माहिती मिळाली आहे.
Nokia Style+ चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
MysmartPrice च्या रिपोर्टमधून नोकिया स्टाईल प्लसच्या एफसीसी लिस्टिंगची माहिती मिळाली आहे. वेबसाईटवर हा स्मार्टफोन TA-1448 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. हा हँडसेट 4900mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. एफसीसी लिस्टिंगनुसार Nokia Style+ एक 5G स्मार्टफोन असेल. लिस्टिंगमध्ये AD-020US मॉडेल नंबरसह चार्जर देखील लिस्ट करण्यात आला आहे. आधीच्या रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
फोनमध्ये LCD डिस्प्ले मिळेल. सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात मेन सेन्सर 48MP, अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर 5MP चा आणि डेप्थ सेन्सर 2MP चा असेल. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. WiFi Alliance च्या लिस्टिंगनुसार हा नोकिया स्मार्टफोन Android 12 वर चालेल.
अशी असेल डिजाईन
काही दिवसांपूर्वी Nokia Style+ च्या रेंडर्सनुसार हा फोन 166.1mm लांब आणि 76.4mm रुंद असेल. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश मिळेल. सध्या समोर आलेली माहिती अधिकृत समजत येणार नाही. परंतु लवकरच कंपनीकडून अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.