नोकिया ६.१ स्मार्टफोनची लिस्टिंग

By शेखर पाटील | Published: May 10, 2018 10:52 AM2018-05-10T10:52:38+5:302018-05-10T10:52:38+5:30

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६.१ या मॉडेलला भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

Nokia 6.1 smartphone listing | नोकिया ६.१ स्मार्टफोनची लिस्टिंग

नोकिया ६.१ स्मार्टफोनची लिस्टिंग

googlenewsNext

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी नोकिया ६ हा स्मार्टफोन सादर केला होता. या वर्षाच्या प्रारंभी बार्सिलोना शहरात झालेल्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये याची नवीन आवृत्ती नोकिया ६ (२०१८) या नावाने जाहीर करण्यात आली होती. गत महिन्याच्या प्रारंभी याची ३ जीबी रॅम असणारी आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली होती. आता याची ४ जीबी रॅम असणारी आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे. हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून १८,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. याला कंपनीने नोकिया ६.१ असे नाव दिले आहे. याची सध्या या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली असून १३ मे पासून प्रत्यक्षात हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोकिया ६.१ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर आहे. याची रॅम ४ जीबी व ६४ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा १६ ते सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

नोकिया ६.१ या मॉडेलला एयरटेलची कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली असून याच्या अंतर्गत ग्राहकांना २ हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर ‘मेक माय ट्रिप’ या अ‍ॅग्रीगेटरने देशांतर्गत हॉटेल्सच्या बुकींगसाठी २५ टक्के सवलत देऊ केली आहे

Web Title: Nokia 6.1 smartphone listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.