शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दमदार बॅटरी, कमी किंमत... Nokia चे दोन स्मार्टफोन भारतात लाँच; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:56 IST

Nokia 5.4, Nokia 3.4 launched in india: HMD भारतात लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन

ठळक मुद्देHMD भारतात लाँच केले दोन बजेट स्मार्टफोनग्राहकांकडे पाहता नोकियानं लाँच केलं स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन

Nokia 5.4, Nokia 3.4 launched in india: Nokia 5.4, Nokia 3.4 launched in india:  HMD ग्लोबल ने भारतात दोन बजेट स्मार्टफोन Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच केले आहेत. Nokia 5.4 मद्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. Nokia 3.4 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. स्मार्टफोन्सच्या मुख्य फीचरबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये Qualcomm Snapdragon SoC प्रोसेसर वापरण्यात आला आहे. कंपनीननं हे दोन स्मार्टफोन्स गेल्या वर्षी युरोपिय बाजारात लाँच केले होते.Nokia 5.4 हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये येतो. पहिला व्हेरिअंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. याची भारतीय बाजारपेठेतील किंमत 13,999 रूपये इतकी आहे. तर दुसरं व्हेरिअंट 6 जीबी रॅम आणि 64 जी स्टोरेजसह येतो. याची भारतीय बाजारपेठेतील किंमत 15,999 रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे Nokia 3.4 हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. याची भारतीय बाजारपेठेतील किंमत 11,999 रुपये इतकी आहे. Nokia 5.4 स्पेसिफिकेशन्सNokia 5.4 हा ड्युअल सिम फोन असून हा अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 10 सह येतो. हा फोन अँड्रॉईड व्हर्जन 11 वर अपग्रेडही करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 SoC हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन मेमरी कार्डलाही सपोर्ट करत असून 512 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हीटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ,  GPS/ A-GPS, युएसबी टाईप सी पोर्ट आणि 3.5 mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. तसंच यामध्ये मागील बाजूला फिंगरप्रिन्ट सेन्सरही आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये  4,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 10W चार्जिंग सपोर्ट करते.Nokia 5.4 च्या कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर यामध्ये रिअर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसंच यासोबत एलईडी मॉड्युलही देण्यात आलं आहे. या शिवायत यात 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड क‌ॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. Nokia 3.4 स्पेसिफिकेशन्स  Nokia 5.4 हा ड्युअल सिम फोन असून हा अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 10 सह येतो. हा फोन अँड्रॉईड व्हर्जन 11 वर अपग्रेडही करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 SoC हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन मेमरी कार्डलाही सपोर्ट करत असून 512 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हीटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ,  GPS/ A-GPS, युएसबी टाईप सी पोर्ट आणि 3.5 mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये  4,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 5W चार्जिंग सपोर्ट करते. Nokia 3.4 मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आलं आहे. यामध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कॅमेरा सेटअपमध्ये 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल का डेप्थ सेंन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडियो कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमराही देण्यात आला आहे.

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनIndiaभारत