स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Updated: August 3, 2021 15:49 IST2021-08-03T15:47:10+5:302021-08-03T15:49:04+5:30
Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे.

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये
भारतात अजूनही लोक फिचर फोन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत, याचा प्रत्यय जियोफोनच्या यशावरून येतो. जियोफोन हा भारतातील पहिला 4G फिचरफोन आहे, त्यानंतर आलेल्या जियोफोन 2 ला इतके यश मिळाले नाही. परंतु आता नोकिया फिचर फोन सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. HMD ग्लोबल लवकरच नवीन नोकिया फीचर फोन Nokia 400 सादर करणार आहे. हा नोकिया फीचर फोन गुगलच्या अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टमसह लाँच होईल.
नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. हा फोन या व्हिडीओमध्ये एखाद्या सामान्य फिचर फोन प्रमाणे दिसत आहे. यात एक छोटा डिस्प्ले, एक T9 कीपॅड, एक रिमूवेबल बॅक पॅनल आणि एक प्लॅस्टिक बॉडी आहे.
Nokia 400 फिचर फोन Android 8.10 Oreo ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. यात टच स्क्रीनच्या ऐवजी कीपॅड दिला जाईल. या फोनमध्ये 512MB रॅम देखील मिळेल. गेल्यावर्षी या डिवाइसला ब्लूटूथ आणि वायफाय सर्टिफिकेशन मिळेल आहेत. तसेच या फिचर फोनमध्ये एलटीई सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. इतर अँड्रॉइड फोन्स प्रमाणे यात क्रोम ब्राऊजर, युट्युब, जीमेल या गुगल अॅप्स प्रमाणे इतर लाखो अँड्रॉइड अॅप्स वापरता येतील. हा फोन बाजारात आल्यास जियोफोन आणि इतर अनेक KaiOS वर चालणाऱ्या फिचर फोन्सना चांगलीच टक्कर मिळू शकते.