इंटरनेटची गरज नाही! स्मार्टवॉचमध्ये सेव्ह करा तुमच्या आवडीची गाणी; मिळतोय 3500 चा डिस्काउंट
By सिद्धेश जाधव | Updated: March 26, 2022 16:57 IST2022-03-26T16:56:09+5:302022-03-26T16:57:40+5:30
Noise Colorfit Pro 3 Alpha स्मार्टवॉचनं भारतात ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, स्लीप मॉनिटर, 24/7 हार्ट रेट मॉनिटर आणि मेन्यूस्ट्रल सायकल ट्रॅकरसह एंट्री घेतली आहे.

इंटरनेटची गरज नाही! स्मार्टवॉचमध्ये सेव्ह करा तुमच्या आवडीची गाणी; मिळतोय 3500 चा डिस्काउंट
भारतीय ब्रँड नॉइजनं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीनं Noise Colorfit Pro 3 Alpha स्मार्टवॉच भारतात लाँच केलं आहे. यात इतर स्मार्टवॉचेस प्रमाणे हेल्थ फीचर्स आहेत. परंतु याची खासियत म्हणजे यात म्यूजिक स्टोरेज फीचरसह TWS कम्पॅटिबिलिटी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या वॉचची किंमत आणि फीचर्स.
किंमत
Noise Colorfit Pro 3 Alpha ची किंमत कंपनीनं 8,999 रुपये ठेवली आहे. परंतु कंपनीच्या वेबसाईट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्सवर 5499 रुपयांच्या लाँच प्राईसमध्ये हे स्मार्टवॉच उपलब्ध झालं आहे. हे स्मार्टवॉच 25 मार्चपासून विकत घेता येईल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Noise ColorFit Pro 3 Alpha मध्ये 1.69 इंचाचा एलसीडी डिस्प्ले 500 नीटस ब्राईटनेससह देण्यात आला आहे. यातील बिल्ट-इन अॅलेक्सा तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते. तसेच म्यूजिक स्टोरेज फीचरचा वापर करून तुम्ही 80 गाणी तुमच्या वॉचमध्ये साठवून ठेऊ शकता. जी तुम्ही नॉइज टीडब्लूएस कम्पॅटिबल इयरबड्सच्या मदतीनं ऐकू शकता. तुम्ही यातील 100 पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड फेस वापरून कस्टमाइज करू शकता.
Noise Colorfit Pro 3 Alpha मध्ये ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, स्लीप मॉनिटर, 24/7 हार्ट रेट मॉनिटर आणि मेन्यूस्ट्रल सायकल ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. याती टेम्प्रेचर सेन्सर तुमच्या शरीराचं तापमान सांगतो. सोबत 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. यातील 5ATM वॉटर रेजिस्टन्स खोल पाण्यात देखील हा व्यवस्थित चालेल याची काळजी घेतो. तसेच ब्लूटूथ व्हॉइस कॉलिंग फिचर देखील देण्यात आलं आहे. कंपनीनं या वॉचचे सहा कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.