शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

डेलच्या लॅपटॉपची नवीन श्रुंखला

By शेखर पाटील | Published: January 03, 2018 3:46 PM

डेल कंपनीने आपल्या इन्स्पिरॉन या मालिकेत लॅपटॉपची नवीन श्रुंखला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

डेल कंपनीने आपल्या इन्स्पिरॉन या मालिकेत लॅपटॉपची नवीन श्रुंखला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

डेल कंपनीने इन्स्पिरॉन १३ ७,००० (७३७३); इन्स्पिरॉन १५ ७,००० (७५७०) आणि इन्स्पिरॉन १३ ५,००० (५३७०) हे तीन लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. इंटेलच्या कोअर आय-५ आणि आय-७ या प्रोसेसर्सने युक्त असणारे या तिन्ही मॉडेल्सचे स्वतंत्र व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत.

इन्स्पिरॉन १३ ७,००० (७३७३) हे लॅपटॉप या श्रेणीतील उच्च क्षमतेचे आहे. या मॉडेलमध्ये १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल हाय डेफिनेशन म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत ब्लॅकलीट या प्रकारातील कि-बोर्ड दिलेला असेल. यात क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी बॅटरी देण्यात आली असून ती अवघ्या १५ मिनिटांमध्ये चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात युएसबी टाईप-सी स्ट्रीमिंगसाठी स्मार्टबाईट सुविधा देण्यात आल्या आहेत. विंडोज हॅलो आणि इन्फ्रारेड कॅमेर्‍याच्या मदतीने यात फेसियल रेकग्नीशन प्रणाली दिलेली आहे. यात ८ व १६ जीबी रॅमसह ५१२ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. 

इन्स्पिरॉन १५ ७,००० (७५७०) या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात ३२ जीबीपर्यंत रॅमचे तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी एचडीडी व १ टेराबाईटपर्यंत हार्ड डिस्क ड्राईव्ह या प्रकारातील स्टोअरेजचे पर्याय असतील. यातील बॅटरी ९ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.  तर इन्स्पिरॉन १३ ५,००० (५३७०) या मॉडेलमध्ये १३ इंच आकारमानाचा फुल एचडी डिस्प्ले असेल. यातील रॅम ३२ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी १ टिबीपर्यंतचे पर्याय असतील. या दोन्ही लॅपटॉपमध्ये ग्राफीक कार्डही देण्यात आले असून त्याच्या मदतीने गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. या सर्व मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ६० हजारांपासून सुरू होणार आहे. हे सर्व लॅपटॉप देशभरातील शॉपीजमधून ग्राहकाना खरेदी करता येतील.

टॅग्स :laptopलॅपटॉप