एसरच्या नोटबुकची नवीन मालिका

By शेखर पाटील | Published: April 18, 2018 12:05 PM2018-04-18T12:05:10+5:302018-04-18T12:05:10+5:30

एसर कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नोटबुकच्या तीन मालिका सादर केल्या असून याचे मूल्य 63 हजार 999 रूपयांपासून सुरू होणारे आहे.

A new series of Acer notebooks | एसरच्या नोटबुकची नवीन मालिका

एसरच्या नोटबुकची नवीन मालिका

Next

एसरने अ‍ॅव्हेंजर इन्फीनिटी वॉर एडिशन या आवृत्तीत एकंदरीत तीन नोटबुक लाँच केले आहेत. यात अस्पायर ६ कॅप्टन अमेरिका एडिशन, निट्रो ५ थानोज एडिशन आणि स्विफ्ट ३ आयर्न मॅन एडिशन यांचा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ६३,९९९; ८०,९९९ आणि ७९,९९९ रूपये इतके आहे. हे तिन्ही मॉडेल्स ग्राहकांना ऑनलाईन खरेदीसाठी अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. तर ऑफलाईन पध्दतीत एसर शॉपीज, क्रोमा आणि रिलायन्स डिजीटल शॉपीजमधून मिळणार आहेत. २० एप्रिलपासून ग्राहक या नोटबुकला खरेदी करू शकतो. 

एसर अस्पायर ६ कॅप्टन अमेरिका एडिशन या मॉडेलमध्ये आठव्या पिढीतील कोअर आय५ प्रोसेसर देण्यात आला असून आला एनव्हिडीयाचा जीफोर्स एमएक्स१५० ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. याची रॅम ८ जीबी तर स्टोअरेज १ टेराबाईट असेल. यामध्ये १५.६ इंच आकारमानाचा व फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यातील वेबकॅम हा एचडी क्षमतेचा असून यामध्ये डॉल्बी ऑडिओ प्रिमीयम ही प्रणाली देण्यात आली आहे.

एसर निट्रो ५ थानोज एडिशन या मॉडेलमध्येही १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सातव्या पिढीतील कोअर आय-५ प्रोसेसर असून यासोबत एनव्हिडीयाच्या जीफोर्स जीटीएक्स १०५० ग्राफीक प्रोसेसर प्रदान केलेला आहे. याची रॅम ८ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. तर स्टोअरेजसाठी यात १ टेराबाईपर्यंतचे पर्याय आहेत. उत्तम ध्वनीसाठी यात डॉल्बी ऑडिओ प्रिमीयमसह एसरची टु्रुहार्मनी ही प्रणाली देण्यात आली आहे.

तर एसर स्विफ्ट ३ आयर्न मॅन एडिशन या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये अतिशय आकर्षक आणि मजबूत अशी अ‍ॅल्युमिनीयम बॉडीदेखील दिलेली आहे. यामधील प्रोसेसर हा आठव्या पिढीतील कोअर आय-५ हा असून इंटेल युएचडी ग्राफीक ६२० हे ग्राफीक कार्डदेखील देण्यात आले आहे. यातील रॅम ८ जीबी असून २५६ जीबी स्टोअरेज देण्यात आले आहेत.

एसरच्या या तिन्ही नोटबुक्समध्ये कनेक्टीव्हिटीसाठी ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, युएसबी ३.१ टाईप-सी, युएसबी २.० आदी पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये दीर्घ काळाचा बॅकअप देण्यास सक्षम असणार्‍या बॅटरीज दिलेल्या आहेत. तर हे सर्व मॉडेल्स विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहेत.
 

Web Title: A new series of Acer notebooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.