शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

5 रुपयांत मिळणार Netflixचं सब्सक्रिप्शन, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 12:47 PM

नेटफ्लिक्स इंडियाने भारतीय युजर्सला मोठा झटका दिला आहे.

ठळक मुद्देनेटफ्लिक्स इंडियाने भारतीय युजर्सला मोठा झटका दिला आहे. आतापर्यंत पहिल्यांदा नव्या युजर्सला महिन्याभरासाठी नेटफ्लिक्स वापरणं मोफत मिळत होतं, परंतु आता असं होणार नाही.पहिल्या महिन्यापासून आपल्याला सब्सक्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. Netflixनं याची माहिती आपल्या पोर्टलवर दिली आहे. 

नवी दिल्लीः नेटफ्लिक्स इंडियाने भारतीय युजर्सला मोठा झटका दिला आहे. आतापर्यंत पहिल्यांदा नव्या युजर्सला महिन्याभरासाठी नेटफ्लिक्स वापरणं मोफत मिळत होतं, परंतु आता असं होणार नाही. पहिल्या महिन्यापासून आपल्याला सब्सक्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. Netflixनं याची माहिती आपल्या पोर्टलवर दिली आहे. मागील वर्षी नेटफ्लिक्सने मोबाइल वापरकर्त्यांसाठी मासिक योजना आणली, ज्याची किंमत 199 रुपये आहे. 5 रुपयांत कसं मिळणार नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शननेटफ्लिक्सची ही ऑफर केवळ नवीन युजर्ससाठी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही पहिल्यांदा नेटफ्लिक्स वापरणार असाल तर तुम्हाला पहिल्या महिन्याच्या सब्सक्रिप्शनसाठी 5 रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतर 199 रुपयांपासून 799 रुपयांपर्यंत प्लॅन निवडावे लागतील.  कंपनीकडून नव्या ऑफर्सची पुष्टीगॅजेट्स 360च्या रिपोर्टनुसार, Netflixच्या प्रवक्त्यांनी या ऑफरची खात्री केलेली आहे. 5 रुपयांची प्रमोशनल ऑफर आहे. ज्यात नव्या युजर्सला सुरुवातीला 5 रुपयांचं सब्सक्रिप्शन द्यावं लागणार आहे. ही ऑफर्स सध्या काही युजर्सना उपलब्ध आहे.  गेल्या वर्षी लाँच केला होता स्वस्त प्लॅनगेल्या वर्षी Netflixने मोबाइल युजर्ससाठी मासिक प्लॅन सादर केला होता, ज्यात 199 रुपयांचं सब्सक्रिप्शन आहे. या किमतीत युजर्सना एसडी क्वालिटी मिळणार आहे. एकाच स्क्रीनवर याचा वापर करता येतो. 199 रुपयांत एकाच फोनवर Netflixवर वापरता येणार आहे. कंपनीनं या प्लॅनचं नाव गो- मोबाइल ठेवलं आहे. या मोबाइल प्लॅनचा वापर स्मार्टफोन आणि टॅबलेटवर केला जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये टीव्हीवर व्हिडीओ पाहता येणार नाही. 

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्स