शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

WhatsApp किंवा Telegram नव्हे तर 'ही' सर्व्हिस अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:41 IST

Short Messaging Service : SMS ची सुरूवात 1980 मध्ये झाली होती आणि यावर अमेरिकन लोकांनी विश्वास ठेवला आहे.

जगभरातील लोक WhatsApp, WeChat, Telegram आणि इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स वापरतात. चीनमध्‍ये WeChat आणि जपानमध्‍ये Line सारखी स्‍मार्टफोन अॅप्‍स खूप लोकप्रिय आहेत, परंतु अमेरिकन अजूनही एसएमएस (SMS) म्हणजेच शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसवर (Short Messaging Service) अवलंबून आहेत. SMS ची सुरूवात 1980 मध्ये झाली होती आणि यावर अमेरिकन लोकांनी विश्वास ठेवला आहे.

WhatsApp सह इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्ससाठी इंटरनेट आवश्यक आहे, तर SMS फोन लाइनवर कार्य करते. मोबाइल रिसर्च फर्म Strategy Analytics नुसार, 2020 मध्ये अमेरिकेमध्ये 1 लाख कोटी खाजगी आणि व्यावसायिक SMS आणि MMS पाठवले गेले आहेत.

का लोकप्रिय आहे SMS?Strategy Analytics मध्ये  Wireless Media Research चे संचालक नितेश पटेल म्हणाले की, SMS आणि WhatsApp व्यतिरिक्त अमेरिकेत RCS (Rich Communications Services) देखील वापर करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत SMS खूप लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ते सर्व फोनमध्ये उपलब्ध आहे. कारण, SMS ची सुविधा सर्व फीचर फोन, आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असल्याने त्याचा अधिक वापर करण्यात आला आहे. म्हणजेच SMS च्या मदतीने तुम्ही सर्व लोकांशी कनेक्ट राहू शकता.

दरम्यान, याचा एक मोठा तोटा सुद्धा आहे. SMS सर्व फोनवर वापरले जाऊ शकते, तर दुसरीकडे त्यात सुरक्षिततेची कमतरता देखील आहेत. त्यात मॉडर्न अॅप्ससारखे फीचर्सही मिळत नाहीत. अमेरिकन लोकांमध्ये SMS च्या लोकप्रियतेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अधिक सोयीस्कर टेक्नॉलॉजी हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. तसेच, हे देखील माहीत होते की, अमेरिकन लोकांची स्मार्टफोन वापरण्याची सवय जगातील इतर युजर्सपेक्षा वेगळी आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान