शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:32 IST

चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

भारत सरकारने मोठे डिजिटल स्ट्राइक करत 300 हून अधिक मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये तयार करण्यात आलेले जवळपास 348 मोबाईल अ‍ॅप्स नागरिकांच्या प्रोफायलिंगसाठी युजर्सची माहिती गोळा करून परदेशात पाठवत असल्याचे म्हणत, ब्लॉक केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाजपचे रोडमल नागर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

देशाबाहेर पाठवत होते डेटा - चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

ते म्हणाले, "एमएचएच्या विनंती वरून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) असे 348 मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. कारण अशा पद्धतीचे डेटा ट्रांसमिशन म्हणजे, भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे, तसेच भारताच्या आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन आहे."

चीनमध्ये तयार झाले आहेत काही अ‍ॅप्स -यावेळी, हे सर्व अ‍ॅप्स चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत? असे विचारले असता, चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स चीनसह विविध देशांत तयार करण्यात आले आहेत." यापूर्वीही भारत सरकारने अशा पद्धतीची कारवाई करत डिजिटल स्ट्राइक केले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAndroidअँड्रॉईडchinaचीनParliamentसंसद