शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

108MP कॅमेरा, वेगवान डिस्प्ले आणि फ्लॅगशिप प्रोसेसर असलेला Motorola Edge 20 Pro भारतात सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: October 1, 2021 15:51 IST

Motorola Edge 20 Pro Price In India: Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन Snapdragon 870 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरीसह भारतात सादर करण्यात आला आहे.

मोटोरोलाने आपला नवीन धमाकेदार स्मार्टफोन Motorola Edge 20 Pro भारतात लाँच केले आहे. याआधी कंपनीने आपल्या Edge 20 सीरिजमध्ये Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion हे दोन फोन सादर केले होते. Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन देशात वेगवान डिस्प्ले, फ्लॅगशिप चिपसेट, दमदार कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह उतरवण्यात आला आहे.  

Motorola Edge 20 Pro ची किंमत 

Motorola Edge 20 Pro स्मार्टफोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये बँक ऑफर्सनंतर हा फोन 35,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Motorola Edge 20 Pro मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC आणि Adreno 650 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंतचा Turbo LPDDR5 रॅम आणि 128GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेजसह मिळते.  

हा फोन अँड्रॉइड 11 आधारित नियर अँड्रॉइड स्टॉक युआयवर चालतो.  कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, dual-band Wi-Fi, MIMO, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. Motorola Edge 20 Pro मध्ये 4,500mAh ची बॅटरी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

या मोटोरोला स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 5x ऑप्टिकल झूम आणि 50x डिजिटल झूमला सपोर्ट करते. हा फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान