मेफ शाईन एम 815  स्मार्टफोनची एन्ट्री

By शेखर पाटील | Published: October 19, 2017 03:50 PM2017-10-19T15:50:27+5:302017-10-19T15:52:39+5:30

मेफ कंपनीने भारतात आपले मेफ शाईन एम८१५ हा स्मार्टफोन ४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

Moff Shine M815 Smartphone entry | मेफ शाईन एम 815  स्मार्टफोनची एन्ट्री

मेफ शाईन एम 815  स्मार्टफोनची एन्ट्री

Next

मेफ कंपनीने अलीकडेच सावरिया इँपक्स प्रायव्हेट लिमिटेडशी करार करून भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले आहे. याआधी संबंधीत कंपनीने मेफ शाईन एम८२० आणि एम८१० हे स्मार्टफोन सादर केले आहेत. यात आता मेफ शाईन एम८१५ या मॉडेलची भर पडणार आहे. यात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ती ६४ जीबीपर्यंत एक्सपांड करता येणार आहे.

मेफ शाईन एम८१५ या स्मार्टफोनमध्ये तब्बल ४,००० मिलीअॅम्पिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. अलीकडच्या काळात बॅटरी हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. या पार्श्‍वभूमीवर यातील उत्तम बॅटरी मल्टी-टास्किंगसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. यात ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात ब्राईटनेस अ‍ॅडजस्टमेंट आणि नाईट व्हिजन मल्टीशॉटची सुविधा दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Web Title: Moff Shine M815 Smartphone entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.