शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:39 IST

जीएसएमए कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. 

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका टेक इंटस्ट्रीला सुद्धा बसला आहे. याबाबतचा धोका लक्षात घेऊन 'जीएसएमए'ने(GSMA) जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 (Mobile World Congress 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीएसएमए कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, नोकिया, फेसबुक, विवो, सोनी आणिअॅमेझॉन यासारख्या कंपन्यांनी आधीची या इव्हेंटमधून बॅकआऊट केले आहे. कोरोना व्हायरसची भीषणता लक्षात घेऊन आमच्या कर्मचारी आणि पार्टनर्सच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या इव्हेंटमध्ये भाग घेतला नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले आहे. 

(जबरदस्त फीचर्स असलेला Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लाँच; जाणून घ्या खासियत)

आम्ही बार्सिलोनामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ देणार  नाही. त्यामुळे आम्ही मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हा इव्हेंट रद्द केला आहे. कंपनी चीन आणि कोरोना व्हायरसशी झुंजणाऱ्या नागरिकांच्यासोबत आहे, असे जीएसएमएने म्हटले आहे. तसेच, पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हा इव्हेंट आयोजित करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.  

(आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या)

चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये आतापर्यंत 44 हजार जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. तसेच, चीनबाहेरही या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या भीषण परिस्थिती असून, या व्हायरसचा फैलाव झालेल्या हुबेई प्रांताचा संपर्क चीनच्या इतर भागापासून तोडण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांना घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.   

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcorona virusकोरोना