शहरं
Join us  
Trending Stories
1
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
2
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
3
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
4
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
5
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
6
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
8
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
9
लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत
10
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
11
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
12
मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र
13
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
14
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
15
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
16
"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह
17
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
18
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक
19
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
20
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी

मायक्रोसॉफ्टने सादर केलं Office 2021; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: October 02, 2021 6:36 PM

Microsoft Office 2021 कंपनीच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टमसह उपलब्ध होईल. याचे दोन व्हर्जन बिजनेस आणि स्टुडंट असे उपलब्ध होतील.

मायक्रोसॉफ्टची नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. 5 ऑक्टोबरच्या अधिकृत लाँचपूर्वी कंपनीने Office 2021 ची किंमत आणि फीचर्स जगासमोर ठेवले आहेत. ऑफिसचे नवीन व्हर्जन विंडोज 11 सह सादर केले जाईल. Office 2021 चे एक वेगळे व्हर्जन बिजनेसेस आणि युजर्ससाठी सादर करण्यात येईल, ज्यांना Microsoft 365 सबस्क्रिप्शन नको आहे.  

Office 2021 मधील सर्व अ‍ॅप्स नव्या लूकसह सादर केले जातील. तसेच यात जास्त स्टॉक इमेजेस, कमांड्स शोधण्यासाठी सर्च बॉक्स, सुधारित परफॉर्मन्स, नवीन ड्रा टॅब, ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट (ODF) 1.3 सपोर्ट इत्यादी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने रियल टाइम को ऑथारिन्ग फिचरची घोषणा केली आहे. म्हणजे अनेक लोक वनड्राइव्हमध्ये सेव केलेल्या एकाच डॉक्युमेंटवर काम करू शकतात.  

Office Home and Student 2021 व्हर्जनमध्ये वर्ड, एक्ससेल, पॉवर पॉईंट, वननोट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स हे अ‍ॅप्स मिळतील. पीसी आणि मॅकवर उपलब्ध होणाऱ्या या व्हर्जनची किंमत 149.99 डॉलर (सुमारे 11,100) असेल. तर Office Home and Business 2021 व्हर्जनसाठी 249.99 डॉलर (सुमारे 18,500) द्यावे लागतील. बिजनेस व्हर्जनमध्ये इतर अ‍ॅप्ससह आऊटलूक आणि सर्व अ‍ॅप्स बिजनेससाठी वापरण्याचा हक्क मिळेल.  

मायक्रोसॉफ्ट 5 ऑक्टोबरपासून Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम Windows 10 वरील पात्र पीसीसाठी रोल आउट करण्यास सुरुवात करणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व सर्व पीसी नवीन व्हर्जनवर अपडेट होणार नाहीत, ही प्रक्रिया टप्प्या टप्प्यात पार पडेल. कंपनीने सर्व पात्र डिवाइस 2022 पर्यंत नवीन 11 वर मोफत अपग्रेड केले जातील, असे सांगितले आहे. विंडोज युजर सेटिंगमध्ये जाऊन विंडोज अपडेट उपलब्ध झाला आहे कि नाही हे बघू शकतात. जर तुमचा पीसी विंडोज 11 साठी पात्र नसेल, तर माइक्रोसॉफ्टकडून 14 ऑक्टोबर, 2025 पर्यंत विंडोज 10 चा सपोर्ट देण्यात येईल.   

टॅग्स :laptopलॅपटॉप