चिनी स्मार्टफोन नको? 10 हजारांच्या आत Micromax In 2 होऊ शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

By सिद्धेश जाधव | Published: February 11, 2022 03:41 PM2022-02-11T15:41:13+5:302022-02-11T15:41:34+5:30

Budget Smartphone Micromax In 2: Micromax In 2 स्मार्टफोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. यात 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा मिळू शकतो.

Micromax In 2 Launching Soon In India in Low Budget Specifications Leaked | चिनी स्मार्टफोन नको? 10 हजारांच्या आत Micromax In 2 होऊ शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

चिनी स्मार्टफोन नको? 10 हजारांच्या आत Micromax In 2 होऊ शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

Next

Micromax नं काही दिवसांपूर्वी भारतात Micromax In Note 2 नावाचा स्मार्टफोन सादर केला होता. यात 48MP चा कॅमेरा, Helio G95 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी, असे स्पेक्स देण्यात आले होते. आता अजून एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करण्याची तयारी स्वदेशी कंपनी करता आहे. हा फोन 10,000 ते 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो आणि याचे नाव Micromax In 2 नावाने भारतात लाँच होईल. 

Micromax In 2 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

लीकनुसार, मायक्रोमॅक्स इन 2 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. हा स्वदेशी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालेल, ज्यावर कोणतीही कस्टम स्किन मिळणार नाही. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट मिळू शकतो. परंतु रॅम आणि स्टोरेज किती असेल, हे साध्य तरी सांगता येणार नाही.  

फोटोग्राफीसाठी या मायक्रोमॅक्स फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल. सोबत 2 मेगापिक्सलचे दोन अन्य सेन्सर मिळतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल.  

Micromax In 2 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच मोठी बॅटरी कंपनी देऊ शकते. ही बॅटरी 18वॉट च्या फास्ट स्पीडनं चार्ज करता येईल. ही सर्व माहिती लीक झालेली आहे, मायक्रोमॅक्सनं मात्र अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.  

हे देखील वाचा:

Web Title: Micromax In 2 Launching Soon In India in Low Budget Specifications Leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.