मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफची लिस्टिंग
By शेखर पाटील | Updated: March 27, 2018 14:43 IST2018-03-27T14:43:51+5:302018-03-27T14:43:51+5:30
मायक्रोमॅक्स कंपनीने आपल्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनला ग्राहकांसाठी सादर करण्याचे संकेत दिले असून याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफची लिस्टिंग
मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवर मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनची लिस्टिंग करण्यात आली आहे. यात फिचर्स तसेच मूल्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,४९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. अर्थात मायक्रोमॅक्सने पुन्हा एकदा १० हजार रूपयांच्या आतील किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टवरील लिस्टिंगनुसार या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनमध्ये १८:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असेल. अर्थात या प्रकारातील डिस्प्ले असणारा हा मायक्रोमॅक्सचा तिसरा स्मार्टफोन ठरला आहे. हा डिस्प्ले ५.४५ इंच आकारमानाचा व एचडी प्लस (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा असून यावर २.५ डी ग्लासचे आवरण असेल. यात क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा हा सोनी आयएमएक्स १३५ सेन्सर, एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅश या फिचर्सने सज्ज असून तो १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/२.० अपार्चर आणि ८४ अंशाचा व्ह्यू अँगल असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.