शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगसह लाँच झाला Mi Watch Revolve Active; मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप  

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 2:51 PM

Mi Watch Revolve Active: Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल

शाओमीने आज भारतात Mi 11 सीरिजमध्ये नवीन Mi 11 Lite स्मार्टफोन लाँच केला आहे, या स्मार्टफोनसोबत कंपनीने नवीन जेनरेशनचा स्मार्टवॉच देखील सादर केला आहे. कंपनीने भारतात Mi Watch Revolve Active लाँच केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये अल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा सपोर्ट मिळतो. या वॉटर रेसिस्टन्स स्मार्टवॉचमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.  

Mi Watch Revolve Active ची किंमत  Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल. हा स्मार्टवॉच Black, Beige आणि Navy रंगात उपलब्ध होईल.  

कंपनीने सादर केलेल्या अर्ली बर्ड ऑफरमध्ये Mi Watch Revolve Active फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच HDFC बँक कार्डधारकांना 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल.  

Mi Watch Revolve Active चे स्पेसिफिकेशन्स  Mi Watch Revolve Active मध्ये 1.39-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 454x454 पिक्सेल आहे. ब्लूटूथ 5.0 सपोर्ट असणारा हा वॉच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसोबत वापरता येईल.  

शाओमीच्या या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटर देण्यात आला आहे. हा वॉच तुमच्या झोप तसेच फिटनेसचा देखील ट्रॅक करतो. या वॉचमध्ये 17 प्रोफेशनल तर 100 एक्सटेंडेड स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.  

हा स्मार्टवॉच 50 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टंससह येतो. तसेच यातील अ‍ॅलेक्साच्या मदतीने स्मार्ट डिवाइस कंट्रोल करता येतात. तुम्ही म्युजिक आणि कॅमेरा देखील या स्मार्टवॉचने कंट्रोल करू शकता. 

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड