शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Mi फॅन्ससाठी खास सेल; 999 रुपयांमध्ये विकत घ्या Redmi चा जबरदस्त 5G स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:05 IST

Mi Fan Festival Sale कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Flipkart देखील 6 एप्रिलपासून सुरु आहे. या सेलमधून Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Mi Fan Festival सेलचा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 6 एप्रिलपासून शाओमीच्या अधिकृत वेबसाईटसह Flipkart वर देखील सुरु आहे. सेलमध्ये फक्त स्मार्टफोन्स नव्हे तर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि अन्य डिवाइस देखील स्वस्तात उपलब्ध झाले आहेत. या सेलमध्ये रेडमीचा शानदार स्मार्टफोन, Redmi Note 10T 5G तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. अशी आहे ऑफर... 

Redmi Note 10T 5G वर मिळतोय मोठा डिस्काउंट 

Redmi Note 10T 5G ची मार्केट प्राईस 16,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये Flipkart वर हा स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा 5G फोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

परंतु खरी बचत तर एक्सचेंज ऑफरमुळे होऊ शकते. Redmi Note 10T 5G वर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन मोठी सूट मिळवू शकता. फ्लिपकार्टवर हा 5G फोन 13,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये विकत घेता येईल. पूर्ण एक्सचेंज सूट मिळाल्यास 13,999 रुपयांचा हा डिवाइस फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.  

5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन