शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp या फीचरमुळे थांबणार फ्रॉड कॉल्स, आता कुणाचीही फसवणूक होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:42 IST

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करून ऑनलाइन स्पॅमर्स ...

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करून ऑनलाइन स्पॅमर्स आता युजर्सची फसवणूक करत आहेत. अशा बनावट कॉल्सला रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सायलेन्स अननोन कॉलर्स फीचर आणणार आहे, ज्यामध्ये यूजर्स अनोळखी नंबरवरून येणारे कॉल म्यूट करू शकतील. अलीकडेच हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्सला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून वाचवू शकते. हे फिचर अज्ञात नंबरवरून येणारे कॉल म्यूट करतं. तुम्ही नोटिफिकेशन सेंटर आणि कॉल टॅबमध्ये हे म्यूट कॉल पाहू शकाल. याच्या मदतीने कोणी फोन केला होता हे कळू शकणार आहे. या फीचरच्या मदतीने फ्रॉड कॉल आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासूनही सुटका होणार आहे.

Silence Unknown Callersगेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचर लाँच केले होते. पण या फिचरमध्ये एक मोठी कमतरता आढळली. यात एकत्र जोडलेले ग्रूप मेंबर्स एकमेकांचे मोबाइल क्रमांक पाहू शकत होते. अशा परिस्थितीत स्पॅम कॉलची संख्या वाढली. पण आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी एका फीचरवर काम सुरू केले आहे. सध्या हे फिचर विकसित होत आहे.

नवीन फीचर अशा प्रकारे काम करेलरिपोर्टनुसार, व्हॉट्स अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये 'सायलेन्स अननोन कॉलर्स'चा पर्याय उपलब्ध असेल. यूझर्स ते सुरू करून फ्रॉड कॉल्सपासून मुक्त होऊ शकतात. या फीचरमुळे प्रँक, स्पॅम आणि त्रासदायक कॉल्स थांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, या नवीन फीचरच्या मदतीने यूझर्सना खूप फायदा होणार आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप