शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

मी यूट्युबर: यूट्युबचा ‘शेठ’... विनायक माळीचा बोलबाला!

By सायली शिर्के | Updated: August 21, 2022 07:49 IST

आगरी भाषेचा चपखल वापर करत यूट्युबच्या विश्वात विनायक माळीने ठसा उमटविला आहे.

आगरी भाषेचा चपखल वापर करत यूट्युबच्या विश्वात विनायक माळीने ठसा उमटविला आहे.

प्रबळ इच्छाशक्ती, मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. असंच काहीसं काहीतरी नवं करू पाहणाऱ्या एका तरुणासोबत घडलं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं आणि अल्पावधीत लोकप्रिय होऊन ते सत्यात उतरवलं. यूट्युबच्या दुनियेत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तो म्हणजे सर्वांचा लाडका दादूस, शेठ माणूस... विनायक माळी. त्याच्या आगरी भाषेतील व्हिडीओंनी तरुणांना भुरळ पाडली. त्याच्या भन्नाट व्हिडीओंनी सर्वांना अक्षरशः वेड लावलं.  विनायक माळी ते सर्वांचा लाडका दादूस हा त्याचा प्रवास सोपा नव्हता. आगरी भाषेला घराघरात पोहोचविणाऱ्या विनायकने सुरुवात हिंदी भाषेतून केली. पण हिंदीत हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने आपल्याच भाषेत मजेशीर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली अन् लोकांना ते प्रचंड आवडले. हाच धागा पकडून, त्याने यशाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि विनायक ‘स्टार’ झाला.  शेठ बोल शेठ..., काय रं बावलट... अशा हटके संवादाने लोकांची मनं जिंकली. त्याच्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. शेठ माणूस, गर्लफ्रेंड, माझी बायको या सीरिज प्रचंड गाजताहेत. नवनवीन विषय, वेगवेगळ्या कार, आपलेसे वाटणारे संवाद आणि खळखळून हसायला लावणारे विनोद ही विनायकच्या व्हिडीओंची खासियत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दादूसचे असंख्य चाहते आहेत. यूट्युबवर तब्बल २.३६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. विनायकने अलीकडेच आलिशान कार खरेदी केली. ‘घेतली एकदाची’ म्हणत त्याने मर्सिडिजचा व्हिडीओ शेअर केला होता. आपल्या घवघवीत यशाचं श्रेय तो संपूर्ण टीमला नेहमीच देतो.  - सायली शिर्के, कंटेन्ट एक्झिक्युटिव्ह, लोकमत डॉट कॉम

टॅग्स :YouTubeयु ट्यूब