शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 08:05 IST

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे.

नवी दिल्ली : देशात दहशतवादी घुसवून, हल्ले करून भारतीय सेना बधत नसल्याने पाकिस्तान आणि चीनने वेगवेगळ्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामुळे सावध झालेल्या सैन्यदलाने आपत्कालीन स्थिती घोषित केली असून कोणताही मेल उघडताना त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास उघडू नये असे आदेशच जारी केले आहे. शनिवारी ही सूचना देण्यात आली आहे. 

हा आपत्कालीन अलर्ट तिन्ही सैन्यदलांना देण्यात आला असून एचएनक्यू नोटिस फाइल.एक्सएलएस या हायपरलिंकसोबत फिशिंग मेल सैन्य दलातील जवानांना पाठविण्यात येत आहेत. हे मेल 'पीआरवीआयएनएवायएके.598के@जीओवी.आयएन' या ईमेल आयडीवरून पाठविण्यात येत आहेत, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. 

इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास तो उघडून नये. अशा प्रकारच्या मेलपासून सावध रहा आणि त्याची तक्रार करा तसेच तो मेल डिलीट करावा, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. 

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. सरकारनेही सैन्यदलासाठी सायबर एजन्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एजन्सीचे काम चीन आणि पाकिस्तानातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांना रोखणे आणि परतवून लावण्याचे असणार आहे, असे सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सायबर हल्ल्यामागे नवीन ट्रेंड दिसत आहे. पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय सैन्याच्या जवानांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी दुसऱ्या देशांचा वापर करत आहेत. अनेक प्रकरणांत हे गुप्तहेर दुसऱ्या देशांचे सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून भारतीय सेनेच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये घुसलेले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

पाकिस्तानचा मूळ उद्देश हा भारतीय सैन्याच्या हालचाली, विविध भागांतील तैनाती आणि माजी सैनिकांची माहिती गोळा करणे हा आहे. 2016 मध्ये सायबर हल्लेखोरांनी भारताची स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती असणारी हजारो फाईल चोरली होती. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलcyber crimeसायबर क्राइमPakistanपाकिस्तानchinaचीन