स्वस्त Samsung Galaxy A03 झाला वेबसाईटवर लिस्ट; लवकरच करणार Xiaomi-Realme ची सुट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:43 PM2021-10-22T12:43:05+5:302021-10-22T12:43:27+5:30

Samsung New Mobile 2021 Galaxy A03 Details: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन अधिकृत लाँच पूर्वीच Wi-Fi Alliance वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

low budget phone Samsung Galaxy A03 Wi-Fi Alliance listing specs leaked launch soon  | स्वस्त Samsung Galaxy A03 झाला वेबसाईटवर लिस्ट; लवकरच करणार Xiaomi-Realme ची सुट्टी 

स्वस्त Samsung Galaxy A03 झाला वेबसाईटवर लिस्ट; लवकरच करणार Xiaomi-Realme ची सुट्टी 

Next

सॅमसंगच्या नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोनची माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. कंपनी Samsung Galaxy A03 स्मार्टफोनवर काम करत आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. आता अधिकृत लाँच पूर्वीच हा स्मार्टफोन Wi-Fi Alliance वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

वायफाय अलायन्सच्या लिस्टिंगनुसार Samsung Galaxy A03 स्मार्टफोन SM-A032F/DS मॉडेल नंबरसह बाजारात येईल. या लिस्टिंगमधून हा फोन Wi-Fi, Bluetooth आणि 4G LTE कनेक्टिविटीसह बाजारात येईल हे समजले आहे. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु लवकरच हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल हे मात्र स्पष्ट झाले आहे.  

Samsung Galaxy A03 चे संभाव्य स्पेक्स  

सॅमसंग गॅलेक्सी ए03 स्मार्टफोनच्या एफसीसीवरील लिस्टिंगमधू फोनच्या 5,000एमएएच बॅटरीची माहिती मिळाली होती. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 वर लाँच होईल. ज्यात प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेट दिला जाईल. यात 2 जीबी किंवा 3 जीबी रॅम मिळेल, असे देखील लीकमधून समोर आले आहे.  

ऑगस्टमध्ये आलेल्या Samsung Galaxy A03s चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720x1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या लो बजेट सॅमसंग फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 4GB पर्यंतच्या रॅम आणि 64GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 वर चालतो.   

Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगपिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह Samsung Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: low budget phone Samsung Galaxy A03 Wi-Fi Alliance listing specs leaked launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.