Lokmat AI ची अद्भूत दुनिया: जगभरात 'एआय' आणि मशीन लर्निंग विविध मार्गांनी वैद्यकीय निदान आणि उपचारांना वरदान ठरू लागले आहे. आरोग्य विषयक माहितीचे अल्गोरिदम आणि केलेले विश्लेषण हे काही घटनांमध्ये अचूक निदान आणि अधिक अचूक उपाययोजना करण्यास महत्त्वाचे ठरताना दिसत आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहे. यामुळे एकूणच जगभरात, भारतात आणि महाराष्ट्रातही आरोग्य सेवेतील 'एआय'चा वापर अधिक सक्षमपणे होताना दिसत आहे. 'एआय'चा नेमका कुठे आणि कसा वापर केला जातो, ते थोडक्यात बघूया.
रोगाची ओळख व वेळेत निदान
एआय एक्स-रे, सीटी-स्कॅन, एमआरआयचे रिपोर्ट्स पटकन आणि अचूक वाचून कॅन्सर, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजारांचे निदान लवकर करण्यास मदत होते.
पर्सनलाइज उपचारात प्रभावी
रुग्णाचा इतिहास, रिपोर्ट्स आणि जीवनशैली पाहून रुग्णाला, एआय योग्य औषध, डोस व कोणता उपचार करावा हे सुचवतो. यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात.
डॉक्टरांचा वेळ वाचतो
अपॉइंटमेंट, रिपोर्ट तयार करणे, रुग्णांच्या नोंदी सांभाळणे ही कामे एआय करत असल्याने डॉक्टरांना रुग्णांवर अधिक लक्ष देता येते.
अधिक महत्त्वाचे
ग्रामीण भागांत आरोग्य सेवा टेलिमेडिसिन सिस्टिममुळे तत्काळ पोहोचू शकते. साहजिकच रुग्ण आणि रुग्णालयांचा खर्च कमी होतो. आजार होण्यापूर्वीच इशारे मिळतात त्यामुळे मानवी हानी टळते.
The Quiet Hospital Helper
At a busy hospital, the corridors were full of patients and doctors rushing everywhere. Nurses carried charts, monitors beeped, and everyone seemed tired. In the middle of it all, an Al system quietly scanned reports, X-rays, and test results. It noticed when a patient had a serious problem and alerted the doctors immediately. Thanks to the early warning, the patient got help on time. The hospital ran more safely, and doctors could focus on saving lives. Al didn't replace them-it made their care stronger.
Moral: Al helps keep people healthy and saves lives.
एकूणच एआयमुळे आरोग्यसेवा अधिक अचूक, जलद आणि रुग्ण-केंद्रित होत आहे. रोगांचे लवकर निदान, योग्य उपचार आणि डॉक्टरांचा वेळ वाचणे यामुळे एकूण आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम व विश्वासार्ह बनत आहे यात शंका नाही.
इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
Web Summary : AI is revolutionizing healthcare through early disease detection, personalized treatments, and efficient doctor workflows. Telemedicine extends care to rural areas, reducing costs and preventing crises, ultimately creating a more reliable healthcare system.
Web Summary : एआई शुरुआती रोग का पता लगाने, व्यक्तिगत उपचार और कुशल डॉक्टर वर्कफ़्लो के माध्यम से स्वास्थ्य सेवा में क्रांति ला रहा है। टेलीमेडिसिन ग्रामीण क्षेत्रों में देखभाल का विस्तार करता है, लागत कम करता है और संकटों को रोकता है, अंततः एक अधिक विश्वसनीय स्वास्थ्य सेवा प्रणाली बनाता है।