शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय क्रांती आणि भारतीय सारथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:58 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रत्येक क्रांतीच्या केंद्रस्थानी भारतीय संशोधक आणि नेतृत्व आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या जागतिक पटलावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे केवळ एक तंत्रज्ञान नसून ते सत्ता आणि अर्थव्यवस्थेचे नवीन केंद्र बनले आहे. अमेरिका आणि चीन या देशांनी एआयच्या पायाभूत सुविधा, सुपरकॉम्प्युटर आणि डेटा सेंटरमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या तुलनेत भारत हार्डवेअर आणि संसाधनांच्या बाबतीत आजही काहीसा मागे आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. आपल्याकडील सामाजिक रचना, नोकरशाही आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन यातही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत पिछाडी दिसते.

परंतु या नाण्याला दुसरी आणि अत्यंत तेजस्वी बाजू आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली असो वा लंडनमधील संशोधन केंद्रे, आजच्या बहुतांश एआय नवकल्पनांच्या मागे 'भारतीय मेंदू' हाच सर्वांत मोठा कणा आहे. जगाला चकित करणाऱ्या चॅटजीपीटीपासून ते विज्ञानातील कठीण कोडी सोडवणाऱ्या अल्फाफोल्डपर्यंत, प्रत्येक क्रांतीच्या केंद्रस्थानी भारतीय संशोधक आणि नेतृत्व आहे.

१. एआयचा मूळ शिल्पकार : आशिष वसवानी आणि 'Transformer' क्रांती एआयच्या इतिहासात २०१७ हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. याच वर्षी गुगलच्या आठ संशोधकांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला, ज्याचे नाव होते- 'Attention Is All You Need'. या शोधनिबंधाचे मुख्य लेखक होते आशिष वसवानी. 

आशिष वसवानी यांनी 'Transformer' नावाच्या अशा तंत्रज्ञानाची पायाभरणी केली, ज्याने यंत्रांना भाषेचा संदर्भ समजून घेण्याची क्षमता दिली. आज आपण जे लार्ज लँग्वेज मॉडल्स (एलएलएम) पाहतो, ज्यावर चॅटजीपीटी आधारित आहे, त्याचा आत्मा म्हणजे हा 'ट्रान्सफॉर्मर' आहे. बिट मेस्रा (BIT Mesra) चे माजी विद्यार्थी असलेल्या आशिष यांनी केवळ गुगलसाठी काम केले नाही, तर पूर्ण मानवजातीला एआयच्या एका नव्या युगात प्रवेश करून दिला. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल मानले जाणारे 'ट्युरिंग अवॉर्ड' मिळावे, अशी चर्चा आजही तज्ज्ञांमध्ये रंगते. सध्या ते 'एन्शियल एआय' या आपल्या नवीन स्टार्टअपद्वारे उद्योगांसाठी एआय सोल्युशन्स विकसित करत आहेत.

२. विज्ञानाचे नवे क्षितिज : पुषमीत कोहली आणि मनीष गुप्ता एआय केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही, तर ते विज्ञानातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वापरले जात आहे. यात पुषमीत कोहली यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डेहरादूनमध्ये लहानाचे मोठे झालेले पुषमीत सध्या गुगल डीपमाइंडमध्ये 'एआय फॉर सायन्स' विभागाचे उपाध्यक्ष आहेत.

पुषमीत यांच्या टीमने अल्फाफोल्ड नावाचा प्रकल्प राबवला, ज्याने जीवशास्त्रातील ५० वर्षे जुने 'प्रोटिन फोल्डिंग'चे कोडे सोडवले. या शोधामुळे औषध निर्मिती (ड्रग डिस्कव्हरी) आणि कॅन्सरसारख्या आजारांवरील संशोधनाला मोठी गती मिळाली आहे. अलीकडेच रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झालेले डेव्हिड बेकर आणि डेमिस हॅसाबिस यांच्यासोबत पुषमीत यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे.

दुसरीकडे, मनीष गुप्ता हे असे व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांनी 'ब्रेन ड्रेन'ला नाकारून भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. ते गुगल रिसर्च इंडियाचे संचालक म्हणून काम करत आहेत. भारतातील बहुभाषिक संस्कृती आणि ग्रामीण समस्या लक्षात घेऊन एआयचा वापर कसा करता येईल, यावर त्यांचे संशोधन केंद्रित आहे. भारतीय भाषांमध्ये एआय संवाद साधू शकेल अशा प्रकल्पांमध्ये (उदा. प्रोजेक्ट वाणी) त्यांचे योगदान मोलाचे आहे.

३. अलेक्सा ते परप्लेक्सिटी : रोहित प्रसाद आणि अरविंद श्रीनिवास आपल्या घराघरात पोहोचलेली 'अलेक्सा' जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे देते, तेव्हा त्यामागे रांचीचे रोहित प्रसाद यांचा मेंदू कार्यरत असतो. रोहित प्रसाद यांनी अॅमेझॉनमध्ये अनेक वर्षे एआय विभागाचे नेतृत्व केले. विशेषतः 'आर्टिफिशयल जनरल इंटेलिजन्स' (एजीआय) कडे जाण्याच्या प्रवासात त्यांनी अॅमेझॉनला दिशा दिली.

तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या गुगल सर्चला कोणी टक्कर देऊ शकत असेल, तर ते आहे परप्लेक्सिटी एआय आणि या कंपनीचे संस्थापक आहेत चेन्नईचे अरविंद श्रीनिवास. अरविंद यांनी अतिशय कमी वयात गुगलच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे. 'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२५' नुसार ते भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. त्यांची कंपनी केवळ माहिती शोधत नाही, तर ती माहिती संकलित करून त्याचा सारांश देते, जे एआयच्या भविष्यातील 'सर्च' मॉडेल आहे.

प्रा. ए. एस. मोदी (विभाग प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा)

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Indian minds shaping the future of artificial intelligence.

Web Summary : Indian innovators are at the forefront of the AI revolution, driving advancements from foundational technologies to groundbreaking scientific discoveries and innovative search models, globally.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतIndiaभारतIndiaभारत