शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI शिकतो कसा? माणसासारखाच; पण वेगळ्या पद्धतीने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:30 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपल्या प्रत्येकाला प्रश्न असा पडतो की AI नेमकं शिकतो तरी कसं?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपण लहानपणी चालायला शिकलो आ तेव्हा किती वेळा पडलो होतो? प्रत्येक पडण्यातून आपण काहीतरी शिकलो. AI सुद्धा असाच शिकतो. चुका करत, पुन्हा प्रयत्न करत. मग आपल्या प्रत्येकाला प्रश्न असा पडतो की AI नेमकं शिकतो तरी कसं?

AI म्हणजे काय?

AI म्हणजे Artificial Intelligence अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. माणूस मेंदू वापरून विचार करतो, तर AI डेटा, गणिती सूत्रे आणि संगणकाची शक्ती वापरून निर्णय घेतो. AI ला भावना नसतात; पण तो आपण दिलेल्याउदाहरणांमधून शिकतो. 

टप्पा पहिला : डेटा-म्हणजेच AI चं शालेय पुस्तक. AI शिकण्याची सुरुवात होते डेटापासून. उदा-हजारो कुत्रे किंवा मांजरींचे फोटो असो किंवा लाखो वाक्यांचे मजकूर. आवाज, व्हिडिओ, आकडे हा डेटा म्हणजे AI साठी हे पुस्तक, शिक्षक आणि वर्ग सगळंच असतं. डेटा जितका जास्त आणि योग्य, तितका AI जास्त चांगला शिकतो. Google दर मिनिटाला ५९ लाख शोध नोंदवतो. You tube वर दर मिनिटाला ५०० तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात. हाच डेटा AI ला हुशार बनवतो.

टप्पा दुसरा : पॅटर्न ओळखण्याचं शिक्षण - डेटा पाहताना AI एक महत्त्वाची गोष्ट शिकतो ते म्हणजे पॅटर्न. उदा - कुत्र्याचे कान कसे दिसतात? माणसाचा चेहरा कसा ओळखायचा? प्रश्न विचारल्यावर उत्तर कसं द्यायचं? हा टप्पा म्हणजे AI ला विचार करण्याची सवय लावणं.

टप्पा तिसरा : सराव, चुका आणि सुधारणा - AI सुरुवातीला खूप चुका करतो. तो चुकीचं उत्तर देतो, चुकीचा फोटो ओळखतो. पण प्रत्येक चुकीनंतर : त्याला सांगितलं जातं, हे चुकले आहे? मग तो स्वतः सुधारतो. जसं आपण गणित सोडवताना उत्तर चुकलं की पुन्हा प्रयत्न करतो, तसाच AI सराव करत-करत स्वतः हुशार होतो. यालाच म्हणतात Machine Learning. एक AI मॉडेल ट्रेन करण्यासाठी लाखो ते कोट्यवधी वेळा चुका-सुधारणा केल्या जातात. काही मोठी मॉडेल्स ट्रेन करताना हजारो जीपीयू आणि महिने लागतात.

टप्पा चौथा : आत्मविश्वासाने काम करणारा AI - एकदा पुरेसा सराव झाला की, AI फोटो ओळखतो, भाषा समजतो, प्रश्नांची उत्तरं देतो, आपल्याला गाणी, चित्रपट, व्हिडिओ सुचवतो. म्हणजेच तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतो.

AI शिकणं कधी थांबतं का?

मुळीच नाही ! AI सतत नवीन डेटा अभ्यासतो, नवीन अनुभव घेतो आणि स्वतःला सुधारत राहतो. म्हणूनच कालचा AI आणि आजचा AI वेगळा असतो.

थोडक्यात सांगायचं तर.. AI माणसासारखा विचार करत नाही; पण माणसाकडून शिकतो, चुका करतो, सुधारतो आणि दिवसेंदिवस अधिक हुशार बनत जातो. AI हा आपला स्पर्धक नाही, तर एक हुशार मदतनीस आहे हे यातून आपल्याला लक्षात येते.

डेटापासून सुरुवात

AI म्हणजे Artificial Intelligence अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. माणूस मेंदू वापरून विचार करतो, तर AI डेटा, गणिती सूत्रे आणि संगणकाची शक्ती वापरून निर्णय घेतो. डेटा- म्हणजेच AI चं शालेय पुस्तक. AI शिकण्याची सुरुवात होते डेटापासून.उदा-हजारो कुत्रे किंवा मांजरींचे फोटो असो. आवाज, व्हिडिओ, आकडे हा डेटा म्हणजे AI साठी हे पुस्तक, शिक्षक आणि वर्ग सगळंच असतं.

एआय...

हे चुकले आहे? मग तो स्वतः सुधारतो.

चुका करतो का ? : सराव, चुका आणि सुधारणा - AI सुरुवातीला खूप चुका करतो. तो चुकीचं उत्तर देतो, चुकीचा फोटो ओळखतो. पण प्रत्येक चुकीनंतर : त्याला सांगितलं जातं, हे चुकले आहे? मग तो स्वतः सुधारतो. जसं आपण गणित सोडवताना उत्तर चुकलं की पुन्हा प्रयत्न करतो, तसाच Al सराव करत-करत स्वतः हुशार होतो. यालाच म्हणतात मशिंग लर्निंग, एक AI मॉडेल ट्रेन करण्यासाठी लाखो ते कोट्यवधी वेळा चुका-सुधारणा केल्या जातात. काही मोठी मॉडेल्स ट्रेन करताना हजारो जीपीयू आणि महिने लागतात. AI सतत नवीन डेटा अभ्यासतो, नवीन अनुभव घेतो आणि स्वतःला सुधारत राहतो. म्हणूनच कालचा AI आणि आजचा AI वेगळा असतो.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर) 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञानEducationशिक्षण