शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: शेती, माणूस आणि एआय : डेटावर उभे राहिलेले भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:52 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: इथेच एआय शेती, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याला नवे रूप देत आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एकेकाळी शेती म्हणजे अनुभव, अंदाज आणि निसर्गावरची श्रद्धा होती. पावसाची दिशा, मातीचा स्पर्श, वाऱ्याची चाहूल या सगळ्यावर शेतकऱ्याचा निर्णय अवलंबून असे. आजही हा अनुभव अमूल्य आहे. पण बदलते हवामान, अनिश्चित पर्जन्यमान, वाढते तापमान, कीडरोगांचे नवे प्रकार आणि वाढती लोकसंख्या या सगळ्या दबावांमध्ये केवळ अनुभव पुरेसा राहिलेला नाही.

इथेच एआय शेती, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याला नवे रूप देत आहे. एआय म्हणजे शेतीतील यंत्रमानव नव्हेत. ती म्हणजे डेटावर आधारित निर्णयक्षमता जी माणसाच्या अनुभवाला वैज्ञानिक आधार देते. राष्ट्रीय स्तरावर एआयचा वापर केवळ एका शेतापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरातून गोळ होणारी कीड, रोग, हवामान आणि उत्पादनाची माहिती एकत्र करून एआय आधारित पॅटर्न रिकग्निशन सिस्टीम्स (पीआरएस) तयार केल्या जात आहेत.

आता पुढे काय करता येऊ शकते?

आज AI प्रामुख्याने सल्ला देणारे साधन आहे. पुढील टप्प्यात स्थानिक भाषांतील AI सल्ला प्रणाली अधिक मजबूत करता येतील. हवामान बदलाचे दीर्घकालीन मॉडेलिंग करून पिकांची रचना बदलण्याचे मार्ग सुचवता येतील. माती आरोग्य कार्ड AI विश्लेषण एकत्र करून दीर्घकालीन शेती नियोजन करता येईल. एआय आधारित पाणी वाटप प्रणाली नदीखोरे पातळीवर वापरता येतील. हे प्रयोग केवळ संकल्पना नाहीत. काही भागांत ते आधीच यशस्वी ठरले आहेत.

पीक उत्पादनाचा अंदाज

AI चा महत्त्वाचा उपयोग म्हणजे पीक उत्पादनाचा अंदाज. यासाठी वापरले जाते उपग्रह प्रतिमा, ऐतिहासिक उत्पादन डेटा, हवामान मॉडेल्स, माती आणि पाण्याची माहिती या सगळ्यांच्या आधारे एआय मॉडेल्स उत्पादनाचा अंदाज साधारण 10 टक्के अचूकतेने देऊ शकतात.

शेतकऱ्यांनाच फक्त फायदा होत नाही 

साठवण व्यवस्था नियोजनात मदत होते.

बाजारपेठेतील चढ-उतार नियंत्रित करता येतात.

सरकारी धोरणे अधिक वास्तववादी बनतात.

अन्नसुरक्षेसाठी हा अंदाज निर्णायक ठरतो.

AI शेतीत काय बदलते?

रोग व कीड ओळख - डीप लर्निंग

सिंचन नियोजन - प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स

उत्पादन अंदाज- सॅटेलाइट एमएल

रसायन वापर गरजेनुसार

माणूसविरुद्ध नाही

AI शेतकऱ्याची जागा घेत नाही. ती शेतकऱ्याच्या अनुभवाला डेटा देते. अंदाजाला अचूकता देते. शेतीत माणूसच केंद्रस्थानी राहतो. AI फक्त त्याच्या बाजूने उभी असते - शिस्तबद्ध, शांत आणि सातत्याने निरीक्षण करणारी बुद्धी म्हणून.

The Smart Farm Helper

Sachin was a young farmer who loved his land but worried about his crops. The weather had become confusing. hot one week, heavy rain the next. Ravi used a farming Al app on his phone. Не clicked photos of plant leaves and entered basic details like soil moisture and rainfall. The Al compared this data with thousands of past farm records and warned Ravi about an early plant disease. Ravi treated only the affected plants and saved water and chemicals. His farm stayed healthy, and harvest improved.Moral: Al is a tool that supports human decisions and protects nature when used wisely.

निष्कर्ष

AI ही शेतीसाठी जादू नाही. ती निसर्गाचा अभ्यास करते, माणसाला मदत करते आणि भविष्यासाठी संतुलन साधते. शेतीत AI म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिरेक नव्हे, तर मानवी उत्क्रांतीची पुढची पायरी आहे.

अजिंक्य देशमुख, (लोकमत, पुणे) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Transforming Agriculture with Data-Driven Insights for a Sustainable Future

Web Summary : AI revolutionizes agriculture by providing data-driven insights, enhancing decision-making for farmers. It aids in predicting yields, managing resources, and identifying threats. AI, combined with human experience, ensures sustainable farming practices and food security, paving the way for a balanced future.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती