शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

घरातली विद्युत उपकरणे आता कुठूनही बंद-सुरू करा एका क्लिकवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:51 IST

या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही बंद करू शकणार आहात.

मुंबई: अरे रे..एसी बंद करायचा राहिला.. आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशी हळहळ व्यक्त करणारी वाक्यं कानावर अधूनमधून पडत असते. मात्र, अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही बंद करू शकणार आहात. एवढेच नव्हे तर अॅपच्या मदतीने बाहेरून घरी जाताना घरी पोहोचण्यापूर्वीच तुम्ही एसी सुरू करून आपली खोली थंडगार करू शकणार आहात.सध्या मुंबई शहरात ओमकार, रहेजा युनिव्हर्सल, सनसिटी डेव्हलपर्स, सीबीआरई, नीलम रिएलटर्स, पीएसआयपीएल (कल्पतरू ग्रुप कंपनी) या संकुलात ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत दहा हजार लोकांनी  ‘लोकेटेड’ अॅप डाऊनलोड केले आहे. नव्या काळानुसार तंत्रज्ञानात बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा, वेळेची बचत व्हावी, याकरता हे ‘लोकेटेड’ अॅप विकसित करण्यात आहे. जगण्याचा वेग इतका वाढला आहे की, अनेकदा घरातले अनेक महत्त्वाचे उपकरण बंद करण्यास लोक विसरतात, अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी ‘लोकेटेड’ अॅप अतिशय उपयोगाचे ठरू शकते असे लोकेटेडचे ​संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन बाफना यांनी सांगितले.

 ‘लोकेटेड’ अॅप कसे चालतेआयोटी तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकटेडची संपूर्ण यंत्रणा चालते. घरात एक डिव्हाइस बसवले जाते. त्यावर सेंसर्स असतात. जे विद्युत उपकरणाला जोडले जातात. इंटरनेटच्या माध्यमातून त्याला कंट्रोल केले जाते. एखादं उपकरण सुरू राहिल्यास ते बंद करण्याचा पर्याय देण्यात येतो. तसेच एखादं उपकरण सुरू करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही प्रणाली सध्या संकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून प्ले स्टोअरवर लोकेटेड अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHomeघर