शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

लाव्हाचा बजेट स्मार्टफोन: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: August 28, 2018 6:52 PM

लाव्हा कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

लाव्हा कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

लाव्हा कंपनीने झेड ६० एस हा अतिशय किफायतशीर मूल्याचा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. याची खासियत म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड गो (ओरियो एडिशन) या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे. या मॉडेलचे मूल्य ४,९४९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात हा स्मार्टफोन फक्त ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत हे मॉडेल खरेदी करणार्‍या ग्राहकासाठी कंपनीने वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा जाहीर केली आहे. तर रिलायन्सच्या जिओने या मॉडेलसोबत २,२०० रूपयांचा कॅशबॅकही सादर केला आहे.

लाव्हा झेड ६० एस या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १६:९ असा आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यामध्ये २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. यामध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस हे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये बोके इफेक्ट देण्याची सुविधा दिलेली आहे. तर यामध्ये लाव्हा कंपनीने विकसित केलेल्या शार्प क्लिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यात अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान