Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

By सिद्धेश जाधव | Published: November 9, 2021 02:52 PM2021-11-09T14:52:18+5:302021-11-09T14:53:09+5:30

Lava Agni 5G Price In India and Launch: देशातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone आज Lava Agni 5G च्या स्वरूपात लाँच झाला आहे. हा फोन फक्त 500 रुपये देऊन बुक करता येईल.  

Lava agni 5g launched in india check price and specifications  | Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

Lava Agni 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेसिफिकेशन्स मिळतात.

Next

आज देशातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone सादर झाला आहे. भारतीय कंपनी लावा मोबाईल्सने Lava Agni 5G बाजारात आणला आहे. हा फोन MediaTek Dimensity 810 चिपसेटच्या प्रोसेसिंग पॉवरला सपोर्ट करतो. तसेच यात 90Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेसिफिकेशन्स मिळतात.  

Lava Agni 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Lava Agni 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने आपल्या पहिल्या 5G फोनसाठी MediaTek Dimensity 810 चिपसेटची निवड केली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा लावा फोन Android 11 वर चालतो.  

5G सह या फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. Lava Agni 5G फोनमध्ये फ्लॅशसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा मुख्य सेन्सर, 5MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चे अन्य दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Lava Agni 5G ची किंमत 

Lava Agni 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, त्यासाठी हा फोन 500 रुपये देऊन करावा लागेल. Lava Agni 5G स्मार्टफोनची विक्री 18 नोव्हेंबरपासून दुपारी 12 PM वाजता अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृतवेबसाईटवर सुरु होईल.  

Web Title: Lava agni 5g launched in india check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.