शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गादीवर ठेवलेला लॅपटॉप फुटला; अख्खा फ्लॅटच पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 10:47 IST

इंजिनिअर दुसऱ्या खोलीमध्ये झोपला होता.

गाझियाबाद : अनेकजण कार्यालयातून घरी आल्यावरही लॅपटॉपवर काम करत असतात. अशावेळी सोफा, बेडवर बसून किंवा झोपून लॅपटॉप सुरू ठेवला जातो. हे जीवावर बेतू शकते. सावध व्हा, कारण उत्तर प्रदेशमध्ये असा प्रकार घडला आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घराला आग लागली आहे. 

हा इंजिनिअर दुसऱ्या खोलीमध्ये झोपला होता. सकाळी 8.30 च्या सुमारास जेव्हा धूर त्याच्या खोलीमध्ये पसरल्याने श्वास कोंडला तेव्हा त्याला समजले. जेव्हा तो खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याने लॅपटॉप जळताना पाहिले. लॅपटॉपला लागलेली आग बेडवर पसरली होती. हे पाहून तो घाबरला आणि बाथरूमच्या वाटेने बाल्कनीद्वारे एका खांबावर चढला आणि लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागला. 

हे पाहून शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलावले. आग विझवितानाच या इंजिनिअरलाही सहाव्या मजल्यावरून खाली उतरवण्यात आले. हा इंजिनिअर नोएडाच्या एका कंपनीमध्ये काम करत असून पत्नीसह तो एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. कंपनीचे रात्री आल्यावर काम करत असताना लॅपटॉपची स्क्रीन बंद करून तो दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. तर सकाळी त्याची पत्नी शिक्षिका असल्याने नोकरीवर गेली. यानंतर 8.30 वाजता संपूर्ण घर धुराने भरले होते. 

असा प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो....बेडवर किंवा मांडीवर किंवा पोटावर ठेवून लॅपटॉप वापरू नका. बेडवर धूळ असल्याने ती खालील फॅनमध्ये जाते आणि हवा आत येण्याचा मार्ग रोखला जातो. यामुळे लॅपटॉपमधील उष्णता बाहेर पडू शकत नाही. लॅपटॉपचे काम झाल्यास तो बंद करावा. कधीही चार्जिंगसाठी सोडून जाऊ नका. जिथे लॅपटॉप ठेवला आहे ती जागा घट्ट लादी किंवा पॅडसारखी असायला हवी. बॅटरी खराब झाली असल्यास तातडीने बदलावी. 

टॅग्स :fireआगlaptopलॅपटॉप