शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पुन्हा घुमणार जय पबजीचा नारा! पुढील महिन्यात येतोय PUBG: New State; भारतात देखील होणार उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Updated: October 22, 2021 15:17 IST

PUBG Mobile New State India: गेम डेव्हलपर Krafton ने येत्या 11 नोव्हेंबरला या गेमचा नवीन व्हर्जन PUBG: NEW STATE लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे.  

भारतात PUBG Mobile खूप लोकप्रिय मोबाईल गेम होता. त्यानंतर सरकारने या गेमवर बंदी घातली होती. बंदी नंतर या गेमने देशात पुनरागमन केले परंतु या गेमचे नाव Battlegrounds Mobile India म्हणजे BGMI ठेवण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा या चाहत्यांना जय पबजी असा नारा देण्याची संधी मिळणार आहे. गेम डेव्हलपर Krafton ने येत्या 11 नोव्हेंबरला या गेमचा नवीन व्हर्जन PUBG: NEW STATE लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे.  

एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून क्राफ्टनने PUBG: New State च्या लाँचची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार नवीन पबजी मोबाईल येत्या 11 नोव्हेंबरला जगभरात लाँच केला जाईल. विशेष म्हणजे पबजी: न्यू स्टेट 200 पेक्षा जास्त देश आणि 17 विविध भाषांमध्ये उपलब्ध होईल. तसेच iOS iPhone आणि Android Smartphone अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा गेम इन्स्टॉल करता येईल.  

PUBG: New Stat

पबजी: न्यू स्टेट हा गेम साल 2050 मधील जग या थीमवर आधारित असेल. त्यामुळे यात नवीन गेम मॅप, हत्यार, गाड्या व लोकेशन्स देण्यात येतील. या गेममधे प्लेयर्स ड्रोनचा वापरू करू शकतील आणि  इलेक्ट्रिक कार्स देखील गेम मध्ये मिळतील. ड्रोन स्ट्राईकचा पर्याय देखील युजर्सना देण्यात येईल. विशेष म्हणजे PUBG: New State मधील Recriut System मध्ये एकदा मेल्यानंतर एखादा टीम मेम्बर गेम बघत असेल तर त्याला पुन्हा रिव्हाइव्ह करण्याची संधी मिळेल. तसेच प्रतिस्पर्धी टीम देखील युजर्सना त्याच्या टीममध्ये इन्व्हाईट करू शकते.  

इथे करा PUBG: New State गेमचे रजिस्ट्रेशन  

PUBG: New State मोबाईल गेम Apple App Store तसेच Google Play Store वर रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. भारतात हा गेम प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या सर्व प्लेयर्सना Free Vehicle Skin लाइफटाईम वॅलिडिटीसह देण्यात येईल.   

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान