शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:34 IST

Who is behind the Koo App? How did Koo rise to prominence? : सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या Koo अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयुजर्स कू अ‍ॅपद्वारे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर  करू शकतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. त्यानंतर बऱ्याच भारतीय डेव्हलपर्सनी अनेक मेक इन इंडिया  (made in india) अ‍ॅप्स लॉन्च केले आहेत. असेच एक भारतीय अ‍ॅप 'Koo' आहे. जे Twitter ला भारतीय पर्याय आहे. अनेक भारतीय मंत्र्यांनी व सेलिब्रिटींनी हे भारतीय अ‍ॅप डाऊनलोड करुन साइन अप केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तीही Koo क्लबमध्ये आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया Koo बद्दलची महत्वाची माहिती... (Explained: Who is behind the Koo App, the Indian alternative to Twitter)

Koo हा Twitter ला भारतीय पर्याय आहे. या भारतीय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटची निर्मिती मार्च 2020 मध्ये अप्रम्या राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी केली. हे मुख्यत्वे ट्विटर सारखे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उपयोग वेगवेगळ्या विषयांवर आपले मत देण्यासाठी केला जाऊ शकतो. (The Indian government is backing a homegrown alternative because Twitter won’t bend to its will)

11 भाषेत आहे, हे अ‍ॅप...सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी भाषांना सपोर्ट करते. युजर्स कू अ‍ॅपद्वारे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर  करू शकतात. ट्विटरप्रमाणेच कू देखील आपल्या युजर्सला डायरेक्ट मेसेजद्वारे चॅट करण्याची परवानगी देते. इतकेच नाही तर युजर्स या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर कंटेंट शेअर करू शकतात.

कसे करावे डाऊनलोड Koo? जर तुम्हीही या मेड इन इंडिया अ‍ॅपचा वापर करायचा असले तर तुम्ही हे कू (koo) अ‍ॅप सहज डाऊनलोड करू शकता. हे दोन्ही आयफोन आणि अँड्राईड डिव्हाइसवर डाऊनलोड केले जाऊ शकते. अँड्राईड युजर अ‍ॅपला गुगल स्टोअर आणि आयओएस (iOS) युजर अॅपल अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात. गुगल प्ले स्टोअरवर याचे सरासरी रेटिंग 4.7 स्टार आहे. तर iOS अ‍ॅपवर याचे रेटिंग 4.1 आहे. अँड्राईडवर या अ‍ॅपला आतापर्यंत 49,400 हून अधिक रिव्यू मिळाले आहेत. तसेच, आतापर्यंत हे अ‍ॅप दहा लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. (As Twitter seeks talks, Ministers move to Indian-made app Koo)

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAAPआपMobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयलRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया