शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 17:16 IST

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.

बंगळुरू: स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.बंगळुरू येथील वाय-फाय डब्बा नावाची ही कंपनी अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवत आहे. 'भारतात अजूनही इंटरनेट महाग आहे, जिओ लॉन्च झाल्यापासून इंटरनेटच्या किंमती कमी झाल्यात तरीही भारतात किंमती जास्त आहेत. त्यामुळे इंटरनेट अजून कमी दरात पुरवणं शक्य आहे, अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवण्याचं आमचं लक्ष्य आहे', असं अवघ्या एका वर्षाच्या या कंपनीचं म्हणणं आहे.   वाय-फाय डब्बा ही कंपनी केवळ दोन रूपयात 100 एमबी डेटा, 10 रूपयात 500 एमबी डेटा आणि अवघ्या 20 रूपयात तब्बल 1 जीबी डेटा पुरवत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तासासाठी आहे. दुसरीकडे जिओ 19 रूपयात 150 एमबी डेटा आणि 52 रूपयात 1.05 जीबी डेटा पुरवते. सध्या ही कंपनी केवळ बंगळुरूत सेवा पुरवत आहे. ज्यांना रिचार्ज करायचं असेल त्यांना कंपनीचं हे डेटा प्रीपेड रिचार्ज कुपन छोट्या दुकानांवर, चहाच्या टपरीवर आदी ठिकाणी सहज उपलब्ध होईल. आम्ही वेगळ्या प्रकारचं अत्यंत वेगवान नेटवर्क देत आहोत.  आम्ही बंगळुरू शहरात तुम्हाला सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगवान वायफाय देत आहोत. असं कंपनीच्या वेबसाइटवर लिहीलं आहे.आता मार्केटमध्ये नवीन कंपनी आल्याने इतर कंपन्या काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :WiFiवायफायInternetइंटरनेटJioजिओ