शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

Jio चा जबरदस्त रिचार्ज, दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स अन् फोनही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:55 IST

जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक प्लान ऑफर केले आहेत. जिओला टक्कर देत इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अनेक ऑफर्स आणल्या पण जिओनं आजवर दमदार ऑफर्स देत धक्कातंत्र आजमावलं आहे.

नवी दिल्ली-

जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक प्लान ऑफर केले आहेत. जिओला टक्कर देत इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अनेक ऑफर्स आणल्या पण जिओनं आजवर दमदार ऑफर्स देत धक्कातंत्र आजमावलं आहे. जिओचा एक प्लान तब्बल दोन वर्षांच्या वॅलिडिटीसह उपलब्ध आहे. इतर कोणत्याही टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लान नाही. 

दोन वर्षांची वॅलिडिटी तर मिळतेच पण हा रिचार्ज किफायतशीर देखील आहे आणि याचे फायदेही अनेक आहेत. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लान्स आहेत. पण काही प्लान्स फक्त जिओ फोन युझर्ससाठी आहेत. जे ग्राहक जियोचा स्मार्टफोन वापरतात केवळ अशांनाच या प्लानचा लाभ मिळवता येणार आहे. 

Jio च्या प्लानमध्ये काय मिळणार?जिओच्या दोन वर्षांच्या या प्लानमध्ये तुम्हाला जिओचा फोन देखील दिला जातो. म्हणजेच एका रिचार्जमध्ये दोन वर्षांची वॅलिडीटी आणि एक फोन असे दोन्ही लाभ मिळवता येतील. या प्लानची किंमत १९९९ रुपये इतकी आहे. म्हणजेच दोन हजारांमध्ये तुम्हाला दोन वर्षांच्या वॅलिडिटीचा रिचार्जसोबतच एक फोन देखील मिळतो. या रिचार्जमध्ये ग्राहकांना दोन वर्षांसाठी फ्री व्हाइस कॉलिंग, 48GB डेटा आणि जिओ अॅप्सचं सब्स्क्रिप्सन देखील मिळतं. हा प्लान नव्या यूझर्ससाठी आहे. जे लोक नवा जिओ फोन खरेदी करणार आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल. 

Jio फोनमध्ये खास काय?जिओ फोन हा एक फिचर फोन असूनही अत्यंत खास ठरतो. कारण यात 4G सेवा मिळते. फोनमध्ये 2.4-inch चा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज तुम्हाला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे. यात तुम्हाला WhatsApp, Facebook, YouTube सह अनेक अॅप्सही वापरता येतात. फोनमध्ये कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यासह टॉर्च, एफएम रेडिओ आणि 3.5mm ऑडियो जॅकसह इतर खास फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन