शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

जिओचो स्वस्त आणि मस्त प्लॅन, १२ ओटीटी आणि १००० जीबी डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:09 IST

Jio 599 Plan : या प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळेल आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोफत अॅक्सेस मिळतो? याबद्दल जाणून घ्या...

नवी दिल्ली : जर तुम्हीही रिलायन्स जिओचे (Reliance Jio) नेटवर्क वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रिलायन्स जिओकडे एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, जो कमी किमतीत डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहे. याशिवाय, यामध्ये ओटीटीचे बेनिफिट्स देखिल मिळते. दरम्यान, आम्ही जिओ ५९९ प्लॅनबद्दल बोलत आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळेल आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोफत अॅक्सेस मिळतो? याबद्दल जाणून घ्या...

जिओ एअरफायबर युजर्ससाठी ५९९ रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओकडे आहे. हा प्लॅन सर्वात खास आहे, कारण या प्लॅनमध्ये कमी किमतीत अनेक बेनिफिट्स मिळतात. रिलायन्स जिओच्या ५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये १००० जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो, हा प्लॅन ३० एमबीपीएसच्या स्पीडसह येतो. डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये एअरफायबर युजर्सना फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि ८०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल देखील मिळते. 

१२ ओटीटी अॅप्सचा फायदा या जिओ एअरफायबर प्लॅनसह, तुम्हाला Disney Plus Hotstar, Sony Liv, ZEE5, JioCinema Premium, Sun NXT, Hoichoi, Discovery Plus, Alt Balaji, Eros Now, Lionsgate Play आणि ShemarooMe यासह इतर अनेक OTT अॅप्सचा फायदा मिळतो.

एअरटेलच्या ५९९ प्लॅनबद्दल जाणून घ्या..दुसरीकडे, एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या एक्स्ट्रीम फायबर प्लॅनमध्ये ३० एमबीपीएस पर्यंतचा स्पीड, ३५० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि डिस्ने+ हॉटस्टारसह २० हून अधिक ओटीटी अॅप्सची सुविधा मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्लॅनमध्ये FUP लिमिटसह ३३०० जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे एअरटेल प्लॅनमध्ये कॉलिंग बेनिफिट दिला जात नाही. नवीन कनेक्शन घेताना, जर तुम्ही ६ किंवा १२ महिन्यांचा प्लॅन निवडला तर तुम्हाला कोणताही इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. परंतु जर तुम्ही मासिक प्लॅन निवडला तर तुम्हाला १५०० रुपये इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागेल.

जीएसटीसह किती किंमत?५९९ रुपयांच्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनची ​​किंमत १८ टक्के जीएसटी नंतर ७०६.८२ रुपये असेल. ५९९ रुपयांसोबत १०७.८२ रुपये (१८ टक्के जीएसटी शुल्क) देखील आकारले जाईल.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओtechnologyतंत्रज्ञान