शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

Jio ला मोठा धक्का! किमतीत वाढ झाल्याने युजर्संनी सोडली साथ; 'या' कंपनीची झाली चांदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:39 IST

Reliance Jio : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 मिलियन ग्राहक गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 मिलियन आणि 0.47 मिलियन युजर्स जोडले. व्होडाफोन-आयडियाने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 लाख युजर्स गमावले.

मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36 टक्के, त्यानंतर भारती एअरटेल 30.81 टक्के, व्होडाफोन-आयडिया जवळ 23 टक्के,बीएसएनएल आणि एमटीएनएलचे अनुक्रमे 9.90 टक्के आणि 0.28 टक्के आहेत. बीएसएनएल देशभरात 4G नेटवर्क सुरू करण्यापासून दूर आहे, ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस खासगी दूरसंचार कंपन्यांकडून लागू करण्यात येणारी प्रीपेड दरवाढ आहे.

बीएसएनएलने जोडले नवीन युजर्सखाजगी दूरसंचार कंपन्यांनी कमी पैसे देणाऱ्या ग्राहकांपासून मुक्ती मिळवली, ज्यामुळे त्यांचा सरासरी महसूल प्रति युजर्सच्या (ARPU) आकड्यात सुधारणा होईल आणि बीएसएनएलने नवीन ग्राहक जोडले. मुळात ही सर्वांसाठी एक फायद्याची परिस्थिती आहे. बीएसएनएलने महिन्याभरात प्रभावीपणे जास्तीत जास्त ग्राहक जोडले. टेलिकॉम कंपनीचे 4G नेटवर्क एकदा लाइव्ह झाले की ते अधिक परवडणारे असल्याने लोक खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा त्याला प्राधान्य देतील याचा हा पुरावा आहे. या डेटामुळे बीएसएनएलचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

8.54 मिलियन युजर्सनी केला नंबर पोर्टमहिन्यादरम्यान, एकूण 8.54 मिलियन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) विनंत्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 4.91 मिलियन विनंत्या झोन-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 मिलियन विनंत्या झोन-2 मधून आल्या. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-1 मध्ये सर्वाधिक विनंत्या महाराष्ट्रात करण्यात आल्या, तर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-2 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक विनंत्या करण्यात आल्या. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओBSNLबीएसएनएलVodafoneव्होडाफोन