शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:06 IST

DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार विभागाने बनावट कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच विभागाने १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. हे नंबर बनावट कॉल करण्यासाठी वापरले जात होते. देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.

दूरसंचार विभाग आणि ट्रायने संयुक्तरित्या बनावट कॉल्सविरोधात कारवाई तीव्र केली आहे. ट्रायने गेल्या महिन्यातच एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे आता ऑपरेटर स्वत:च मार्केटिंग आणि बनावट कॉल्स थांबवू शकतात. यामुळे आता व्हॉईसलिस्टिंगची गरज भासणार नाही. 

दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, दररोज जवळपास १.३५ कोटी बनावट कॉल्स थांबवले जात आहेत. याशिवाय, विभागाने बनावट कॉल करणारे १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. लोकांच्या तक्रारींवर विभागाने कारवाई करत पाच दिवसांत सुमारे ७ कोटी कॉल्स बंद केले आहेत. ही आपल्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.

बनावट कॉल्सवर आळा बसेलदूरसंचार विभागाने बनावट कॉल करणाऱ्यांना रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विभागाने लाखो सिमकार्ड बंद केले होते. बनावट कॉल्स रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. तसेच, आतापासून, कॉलर्सना फक्त व्हाइटलिस्ट असलेले टेलीमार्केटिंग कॉल प्राप्त होतील.

११ लाख खाती गोठवण्यात आलीअलीकडेच, दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जवळपास ११ लाख खाती बँकांनी आणि पेमेंट वॉलेटद्वारे गोठवली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे. दूरसंचार विभाग (DOT) सोबत काम करणाऱ्या चार दूरसंचार सेवा ऑपरेटरने (TSPs) ४५ लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान