शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Jio चा धमाका! कमी किंमतीत मिळेल ८४ दिवसांची व्हॅलिडिटी अन् अनलिमिटेड कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:19 IST

Jio Recharge Plan : या प्लॅनच्या खरेदीसाठी युजर्सना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा माय जिओ ॲपवर (My Jio App) जावं लागेल.

Jio Recharge Plan : नवी दिल्ली : अलीकडेच जिओनं (Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे युजर्सना बेनिफिट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले. दरम्यान, आम्ही आज अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनेक बेनिफिट्स आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या प्लॅनच्या खरेदीसाठी युजर्सना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा माय जिओ ॲपवर (My Jio App) जावं लागेल. याठिकाणीच हा प्लॅन उपलब्ध आहे.

जिओचा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅनजिओचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला माय जिओ ॲप किंवा जिओ साइटवर जावं लागेल. येथे तुम्ही ८४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवर गेलात तर हा प्लॅन दिसेल. तसंच तुम्ही हा प्लॅन इतर कोणत्याही ॲपवरून घेऊ शकत नाही. हा प्लॅन पेटीएम, फोनपे किंवा इतर कोणत्याही ॲपवरून खरेदी करता येणार नाही. या रिचार्जसाठी तुम्हाला फक्त जिओ साइटची मदत घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

बेनिफिट्सतुम्ही जिओचा हा प्लॅन विकत घेतल्यास तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची मिळेल. यामध्ये एकूण ६ जीबी डेटा देण्यात आला आहे. तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. तसंच, एकूण १००० एसएमएस दिले जातात आणि त्यासोबत जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. यामध्ये Jio TV, Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. यामुळेच कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्या अशा यूजर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या दृष्टीकोनातून पाहिले तर तुमचा मासिक खर्च १५९ रुपये होईल.

जिओचा नवीन प्रकल्पदरम्यान, फास्ट इंटरनेट सप्लाय करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी जिओचा एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये अंडर सी केबलवर काम सुरू करण्यात आले असून सुपरफास्ट इंटरनेटसाठी मुंबई आणि चेन्नई येथे डाटा सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. एकदा लाँच झाल्यानंतर युजर्सना सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे, जे बऱ्याच बाबतीत चांगलं सिद्ध होईल. तसंच, फास्ट इंटरनेटमुळं तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल