शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?

By हेमंत बावकर | Updated: December 4, 2025 14:01 IST

itel Rhythm Echo TWS Earbuds review: संगीत ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी, गेमिंगसाठी आम्ही हा इअरबड वापरून पाहिला, जाणून घ्या आम्हाला कसा वाटला, त्याची किंमत आदी...

परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन बनवणाऱ्या आयटेल कंपनीने नुकताच Rhythm Echo TWS Earbuds भारतीय बाजारात लाँच केला. हा इअरबड कमी किंमतीत येत असला तरी त्याची डिझाईन आकर्षक आहे आणि तो कानाला आरामदायक बसतो. आम्ही हा इअरबड बराच काळ वापरला, तरी कान दुखणे किंवा अवघड वाटणे अशी कोणतीही समस्या जाणवली नाही. इअरबडवरच टच कंट्रोल देण्यात आले आहेत, ज्यामुळे कॉल घेणे/कट करणे किंवा संगीत नियंत्रित करणे सोपे होते. एवढ्या कमी किमतीत हे फीचर्स मिळत आहेत.

बॅटरी आणि चार्जिंग पॉवर कंपनीने दावा केल्याप्रमाणे या इअरबडला ५० तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. आमच्या दैनंदिन वापरामध्ये (दिवसाचे ३ ते ४ तास) हा इअरबड आम्हाला तब्बल दीड आठवड्यांहून अधिक काळ बॅटरी बॅकअप देत होता आणि तरीही काही दिवसांचा चार्ज शिल्लक होता. स्कूटर चालविताना, चालताना किंवा व्यायामाच्या वेळी सतत बाहेर वापरणाऱ्यांसाठी इतका दमदार बॅटरी बॅकअप हा एक प्लस पॉईंट ठरतो.

कॉलिंग आणि गोंगाटातील कामगिरी (Quad Mic ENC)आजकाल कामाच्या निमित्ताने अनेकजण बाहेर असतात आणि त्याचवेळी महत्त्वाचे फोन येतात. गोंगाटाच्या ठिकाणी फोनवर बोलणे हे एक आव्हान असते. या इअरबडमध्ये चार ENC (Environmental Noise Cancellation) माईक्स देण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या वेळी किंवा सिग्नलवर गाड्यांचा गोंगाट असतानाही आम्ही हे इअरबड वापरले. समोरच्या व्यक्तीला आमचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वाऱ्याचा किंवा आजूबाजूच्या गोंगाटाचा आवाज खूप कमी होऊन जात असल्याने कॉलिंगची पातळी उत्कृष्ट राहिली. हा Rhythm Echo चा सर्वात मोठा यूएसपी आहे.

साऊंड क्वालिटी (संगीत आणि गेमिंग)संगीत अनुभवयामध्ये १०mm चे ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे संगीत ऐकण्याचा अनुभव संतुलित मिळतो. वाद्यांचा आवाज स्पष्ट आणि चांगला लागतो. मात्र, आम्ही यापूर्वी ऐकत असलेल्या गाण्यांच्या तुलनेत गायकांचा आवाज किंचितसा बदललेला किंवा वेगळा जाणवत होता. तरीही, कानांना त्रास होईल अशी कोणतीही समस्या यात जाणवली नाही. तसेच, स्मार्टफोन आणि इअरबड्समध्ये सिंक्रोनायझेशन खूप चांगले होते, मध्येच आवाज तुटणे किंवा जाणे असे जाणवले नाही.

गेमिंग आणि व्हिडिओकमी किमतीच्या इअरबड्समध्ये लो लॅटेन्सी (Low Latency) हे वैशिष्ट्य सहसा नसते, ज्यामुळे गेमिंग किंवा व्हिडिओ पाहताना आवाज आणि व्हिज्युअलमध्ये फरक जाणवतो. परंतु, Rhythm Echo मध्ये केवळ ४५ मिलीसेकंदची अल्ट्रा-लो लॅटेन्सी देण्यात आली आहे. गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव यामुळे चांगला मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : itel Rhythm Echo: Budget earbuds with great battery and noise cancellation.

Web Summary : itel's Rhythm Echo earbuds offer good design, comfort, and touch controls at a low price. The battery lasts over a week with moderate use. ENC mics ensure clear calls even in noisy environments. Balanced sound and low latency enhance music and gaming.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान