फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Published: September 7, 2021 05:56 PM2021-09-07T17:56:10+5:302021-09-07T18:00:54+5:30

Budget Smartphone Itel Vision 2S: आयटेलने भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Itel launched vision 2s with 5000mah battery price rs 6999  | फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Next
ठळक मुद्दे या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन कंपनीने प्रीमियम डिजाईनसह सादर केला आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी आयटेलने भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. आज कंपनीने भारतीय मार्केटमध्ये आपल्या प्रीमियम-अफोर्डेबल विजन सीरीजमध्ये Vision 2S स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा एक अँड्रॉइड गो आधारित स्मार्टफोन आहे जो 2GB रॅम, 8MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.  

Itel Vision 2S चे स्पेसिफिकेशन्स 

Itel Vision 2S स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी प्‍लस डिस्प्ले दिला आहे. हा एका वाटरड्रॉप डिझाइन्ससह सादर झालेला आयपीएस पॅनल आहे. हा फोन 90 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 20:9 अस्‍पेक्‍ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज ऑक्टकोर Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 (गो एडिशन) ऑपरेटिंग सिस्‍टमवर चालतो.  

Itel Vision 2S मध्ये कंपनीने फोटोग्राफीसाठी ड्युअल एआय रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात 8 मेगापिक्‍सलचा मुख्य सेन्सर मिळतो. या फोनमध्ये एआय ब्‍यूटी मोडसह 5 मेगापिक्‍सलचा सेल्‍फी कॅमेरा देण्यात आला आहे. या बजेट स्‍मार्टफोनमधील 5000एमएएचची बॅटरी 24 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि 25 तासांचा टॉक टाइम देऊ शकते.  

विशेष म्हणजे बजेटमध्ये लाँच होऊन देखील या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक आणि फ‍िंगरप्रिंट सेन्सर असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हा डिवाइस ग्रेडेशन पर्पल, ग्रेडेशन ब्‍लू आणि डीप ब्‍लू अश्या तीन रंगात उपलब्ध होईल. या स्‍मार्टफोनसोबत एक्‍सक्‍लूसिव विआयपी ऑफर अंतर्गत 100 दिवसांच्या आत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत मिळेल.  

Web Title: Itel launched vision 2s with 5000mah battery price rs 6999 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app