शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

इस्त्रोकडे अजब यान! भारताला जेव्हा गरज तेव्हा क्षेपणास्त्र बनणार; युद्धाची पद्धतच बदलण्याचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 15:52 IST

अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिका, रशिया, चायना फायदा उठवू पाहत आहेत. अशा प्रकारच्या यानाद्वारे कोणत्याही दुश्मनाच्या सॅटेलाईटला उध्वस्त करता येणार आहे.

इस्त्रो सध्या एक वेगळ्या कल्पनेवर प्रयोग करत आहे. इस्त्रो येत्या २८ जानेवारीला रीयुजेबल लाँच व्हेईकल (RLV) च्या उड्डाणाचा प्रयोग करणार आहे. याची माहिती इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी दिली आहे. 

हे एक स्वदेशी स्पेस शटल आहे. यास ऑर्बिटल री-एंट्री व्हेईकल देखील म्हटले जाते. लाँचिंगपूर्वी ते एका छोट्या रॉकेट किंवा हेलिकॉप्टरला जोडून जमिनीपासून तीन किमी वर नेण्यात येणार आहे. तेथून ते स्वत:च खाली येईल आणि स्वत:च लँडिंग करेल. हा प्रयोग सफल राहिला तर भारत केवळ सॅटेलाईट लाँचच करेल असे नाही तर आपल्या आकाशाची सुरक्षा करण्यासही तो सक्षम होणार आहे. 

अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिका, रशिया, चायना फायदा उठवू पाहत आहेत. अशा प्रकारच्या यानाद्वारे कोणत्याही दुश्मनाच्या सॅटेलाईटला उध्वस्त करता येणार आहे. अशा विमानांमधून डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) चालवता येते. उर्जेचा गोळा पाठवून शत्रूची संचार सिस्टिम उध्वस्त करता येते. पॉवर ग्रीड किंवा कॉम्प्युटर प्रणाली देखील नष्ट करता येतात. याद्वारे भारत शत्रूच्या प्रदेशात देखील धुमाकूळ घालू शकतो. 

2030 पर्यंत हा प्रकल्प यशस्वी करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. असे झाल्यास पुन्हा पुन्हा रॉकेट बनवण्याचा खर्च वाचणार आहे. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर तो परत येईल. थोड्या देखभालीनंतर, तो उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी परत पाठविला जाऊ शकतो. यामुळे अंतराळ मोहिमेचा खर्च किमान 10 पटीने कमी होईल. अशा स्पेस शटल बनवणाऱ्यांमध्ये सध्या फक्त अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जपान यांचा समावेश आहे. रशियाने 1989 मध्ये असेच एक शटल बनवले होते ज्याने एकदाच उड्डाण केले होते.  

टॅग्स :isroइस्रो