शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

‘आयफोन’मुळे आरोग्याला खरंच धोका आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 10:20 AM

फ्रान्सने ‘आयफोन 12’च्या विक्रीवर बंदी आणलीय, त्याबाबत...

पवन देशपांडे सहायक  संपादक  आम्ही कधी विचार केलाय का? ज्या मोबाइलवर आपली दिवस-रात्र नजर असते, तो मोबाइल आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो... त्यातून किती रेडिएशन बाहेर येते आणि त्याचा खरंच आपल्याला धोका आहे का? तुम्ही केला नसेलही; पण अनेक संस्था/संघटना या रेडिएशनविरोधात लढत आहेत आणि त्यावर लक्ष ठेवून आहेत.

एखादी मोबाइल कंपनी जरा कुठे मर्यादेच्या बाहेर गेली, की लगेच त्याविरोधात ओरड सुरू होते. नुकतेच फ्रान्समध्येही असेच काही घडले. दोन-तीन दिवसांपूर्वी ‘ॲपल’ने ‘आयफोन १५’ लॉन्च केला आणि त्याच दिवशी फ्रान्समध्ये ‘ॲपल’च्या ‘आयफोन १२’ या फोनच्या विक्रीवर तेथील सरकारने बंदी आणली. का? तर त्यातून होणाऱ्या रेडिएशनमुळे. फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे की, ‘आयफोन १२’ हे मॉडेल अधिक रेडिएशन उत्सर्जित करते. ते सरकारने दिलेल्या मानकांनुसार नाही. त्यामुळे ‘आयफोन १२’ फ्रान्समध्ये विकता येणार नाहीत. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून हा फोन जगभरात विकला जातोय, मग आताच कसा रेडिएशनचा धोका निर्माण झाला, असा सवालही आहे. फ्रान्स सरकारने अचानक १४० मोबाइलच्या रेडिएशनची चाचणी घेतली. ‘आयफोन १२’च्या दोन मॉडेलमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक रेडिएशन आढळले. युरोपियन युनियनच्या मानकांनुसार, रेडिएशनची मर्यादा प्रतिकिलो चार वॉटच्या आत हवी. ‘आयफोन १२’मध्ये ती ५.७४ एवढी होती. त्यामुळे ते धोक्याचे असल्याचे सरकारने म्हटले आहे.

तिथेच बंदी का?  रेडिएशनबाबत युरोपियन युनियन आणि जागतिक मानकामध्ये तफावत आहे. जागतिक मर्यादेपेक्षा युरोपियन युनियनमध्ये कमी मर्यादा आहे. त्यामुळे तिथे कमी रेडिएशन ठेवावे लागते. आता फ्रान्स सरकारच्या घोषणेनुसार ‘ॲपल’ला तिथल्या मानकांनुसार विक्री करावी लागेल, अन्यथा त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असता.

‘ॲपल’ची विक्री घटेल? nतूर्तास ‘ॲपल’च्या विक्रीवर काही परिणाम होईल, असे दिसत नाही. कारण त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. n‘आयफोन’चे नवा मॉडेल लॉन्च झाल्यानंतर जुन्या मॉडेलच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे कदाचित रेडिएशनची ही टूम नव्या मॉडेलच्या विक्रीसाठी तर नसेल? 

रेडिएशनमुळे खरंच धोका?  मोबाइलमधल्या रेडिएशनमुळे कुणाला धोका निर्माण झाल्याचे आजवर आढळले नाही. जागतिक आरोग्य संघटनेचेही तेच म्हणणे आहे. 

‘ॲपल’चे म्हणणे काय? ‘ॲपल’ने म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ‘आयफोन १२’ योग्य आहे. २०२० मध्ये हा फोन लॉन्च केला आणि २०२१ मध्ये फ्रान्सच्याच रेडिएशन चाचणीमध्येही पास झाला होता. त्यामुळे आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून फायदा नाही. पण ‘ॲपल’ला फ्रान्समध्येच काय, पूर्ण युरोपात जरी फोन विकायचा असेल, तर युरोपीय महासंघाच्या मानकांनुसारच त्यांना बदल करावे लागतील. ॲपल त्यासाठी तयार झाल्याचेही वृत्त होते. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करून रेडिएशन पातळी कमी करणार आहेत.

टॅग्स :Apple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Smartphoneस्मार्टफोन