शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तुमची प्रायव्हसी धोक्यात! Google तुमचे बोलणे एकतोय; 'ते' फिचर बंद कसे कराल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:40 IST

Google Voice Activity: तुम्ही जे बोलता, त्याची जाहिरात फोनमध्ये दिसते?

Google Voice Activity: तुम्ही फोनमध्ये काही बोलत असाल, तर काही वेळानंतर संबंधित प्रोडक्टची जाहिराती फोनमध्ये दिसते. याचा अनुभव अनेकांना येतो, तुम्हालाही आला असेल. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, गूगल आपल्या नकळत आपली संभाषणे रेकॉर्ड करतो का? या प्रश्नाचे उत्तर थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ असे नसले, तरी यामागे एक महत्त्वाचे फिचर Google Voice Activity आहे.

Google Voice Activity म्हणजे काय?

Google Voice Activity हे गूगल अकाउंटशी संबंधित फिचर आहे. जेव्हा तुम्ही “Ok Google” किंवा “Hey Google” असे म्हणता आणि आवाजाद्वारे (Voice Search) प्रश्न विचारता, तेव्हा त्या व्हॉइस कमांड्स आणि ऑडिओ क्लिप्स तुमच्या अकाउंटमध्ये सेव्ह केल्या जाऊ शकतात. यामागचा उद्देश गूगल असिस्टंट अधिक अचूक बनवणे आणि युजर्सना चांगले परिणाम देणे हा आहे.

गूगल नकळत आवाज रेकॉर्ड करतो का?

गूगलच्या म्हणण्यानुसार, युजरने स्वतः वॉयस कमांड दिली किंवा अ‍ॅपला मायक्रोफोनची परवानगी दिली, अशाच वेळी आवाज रेकॉर्ड होतो. मात्र काही वेळा फोन चुकून अ‍ॅक्टिव्ह झाल्यास थोड्या ऑडिओ क्लिप्स सेव्ह होऊ शकतात. यामुळेच “गूगल सतत ऐकत आहे” असा गैरसमज पसरतो.

आपल्या व्हॉइस रेकॉर्डिंग्स कशा पाहायच्या?

तुमच्या गूगल अकाउंटमध्ये कोणकोणत्या व्हॉइस अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह झाल्या आहेत, हे पाहणे अगदी सोपे आहे.

Google Account मध्ये लॉगिन करा

My Activity / Activity Controls सेक्शन उघडा

Voice & Audio Activity या पर्यायावर जा

येथे तारीख, वेळेसह ऑडिओ रेकॉर्डिंग्स दिसतील. तुम्ही त्या ऐकूही शकता.

Voice Activity कशी डिलीट करायची?

जर तुम्हाला या रेकॉर्डिंग्स नको असतील तर एक-एक करत डिलीट करू शकता किंवा संपूर्ण Voice Activity एकाच वेळी क्लिअर करू शकता. तसेच सेटिंग्समध्ये जाऊन Voice & Audio Activity पूर्णपणे बंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

प्रायव्हसी वाढवण्यासाठी काय करावे?

नियमितपणे Google Account Activity तपासा

मायक्रोफोनची परवानगी फक्त गरजेच्या अ‍ॅप्सनाच द्या

“Hey Google” फिचर वापरत नसाल तर ते बंद ठेवा

English
हिंदी सारांश
Web Title : Google Listens? How to Disable Voice Activity and Protect Privacy

Web Summary : Google's Voice Activity feature records voice commands. Review and delete recordings in your Google account. Limit microphone permissions and disable "Hey Google" for enhanced privacy.
टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान