शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह iQOO Z5 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: September 27, 2021 2:33 PM

iQOO Z5 5G Price In India: iQOO Z5 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे.

iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Z5 भारतात सादर केला आहे. मिडरेंज सेगमेंट सादर करण्यात आलेल्या या मोबाईलमध्ये कंपनीने अनेक भन्नाट स्पेक्स दिले आहेत. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा Snapdragon 778G चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगचा समावेश आहे. हा फोन अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या माध्यमातून डिस्काउंटसह विकत घेता येईल.   

iQOO Z5 5G चे स्पेसिफिकेशन्स   

iQOO Z5 5G मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पंच होत डिजाईनसह सादर करण्यात आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो, जे गेमिंगसाठी खूप उपयुक्त ठरतात. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC वर चालतो, तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 670 GPU देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो.  

या फोनमध्ये 12GB पर्यंतचा वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. iQOO Z5 मध्ये 4GB एक्सटेंडेड रॅम, VC लिक्विड कूलिंग सिस्टम, सराऊंड साऊंडसह ड्युअल स्पिकर आणि 4D गेम व्हायब्रेशनसह लिनियर मोटार देण्यात आली आहे.सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.   

iQOO Z5 5G मधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL GW3 मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळते, ही बॅटरी 44W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल.   

iQOO Z5 ची किंमत 

iQOO Z5 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 26,990 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची विक्री 3 ऑक्टोबरपासून Amazon आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुरु होईल. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉनAndroidअँड्रॉईड